एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis on Missing Link: मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम पालखीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ हे आधीच पालखीच्या ठिकाणी उपस्थित होते.

Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंक वरून आलो हेच सगळ्यांना उत्तर असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पुण्यातील नाना पेठेतील निवडुंग विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम पालखीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ हे आधीच पालखीच्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम एकत्रितपणे दर्शनासाठी पोहोचले.

सगळ्यांनी सुखरूप जावं हेच आवाहन

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी देवाकडे येताना काही मागत नाही. न मागता सुद्धा मिळतं. या वारीमध्ये येण्याची एक अनुभूती आहे. ती आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. ते म्हणाले की, सगळ्या वारकऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही सगळे आनंदाने जा आणि सुखरुप जा. वारकरी हे शेतकरी पण आहेत त्यामुळे त्यांच चांगल होवू दे. यंदा वारीसाठी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या ठिकाणी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे. सगळ्यांनी सुखरूप जावं हेच आवाहन असल्याचे ते म्हणाले. 

महाराष्ट्र द्रोहीच आहेत, राज्याचे दुश्मन आहेत

दुसरीकडे, एकनाथ शिंदे आज (10 जुलै) विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही, विदेशातून लोक येत आहेत. महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपल्या विरोधी पक्षातील सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील ते करत आहेत. खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करत आहेत, त्यांना आपण काय म्हणणार? आता इथं महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्र द्रोहीच आहेत. हे राज्याचे दुश्मन आहेत. कुठलाही प्रकल्प बदनाम झाला, तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही, मंत्र्यांची नाही, त्यामुळे शेवटी तारतम्य बाळगलं पाहिजे. 

मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल (Engineering Marvel) आहे. मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही, वाहतूक सुरू झाली. काही लोकांनी जे काही आकाश पाताळ एक केलं की मिसिंग लिंक पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली? किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26 टक्के झाली. मंजूर रकमेच्या 10 टक्क्यांपेक्षा देखील कमी, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर सगळंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी एक कोटी रुपयांचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे असे शिंदे यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget