मविआच्या बैठकांना ब्रेक, लोकसभा जागावाटप रखडलं, त्यामागची कारण कोणती?
MVA seat-sharing : महाविकास आघाडीमध्ये काही जांगावर तिढा आहे, त्यासाठी जानेवारीमध्ये अनेक बैठका झाल्या. पण तोडगा निघाला नाही. त्यात जागावटचापची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच बैठकांना ब्रेक लागल्याचं दिसतेय.
MVA seat-sharing Lok Sabha Election 2024 : दोन आठवड्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकतं. 48 जागा असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिलेय. दोन्हीकडे जागावटपाची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जांगावर तिढा आहे, त्यासाठी जानेवारीमध्ये अनेक बैठका झाल्या. पण तोडगा निघाला नाही. त्यात जागावटचापची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच बैठकांना ब्रेक लागल्याचं दिसतेय. महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटपांच्या बैठका मागील 20 दिवसांपासून झाल्या नाहीयेत. आता महाविकास आघाडीची पुढील बैठक 27 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.
कधीपर्यंत मविआ जागावाटप निश्चित होणार?
जागावाटपासंदर्भात आज 22 फेब्रुवारीला होणारी बैठक आता थेट 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे मागील महिन्यात एकामागे होणाऱ्या बैठकांना कुठेतरी या महिन्यात ब्रेक लागल्याचे चित्र आहे. एकीकडे जागावाटपा संदर्भात चर्चा पूर्ण झाल्याचं सांगण्यात येतेय तरी काही जागांसाठी मविआमध्ये अजूनही भिजत घोंगडे आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम बद्दल सुद्धा कुठलाही निर्णय मविआ कडूनन घेण्यात आलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपल्या पुढील भूमिके संदर्भात संभ्रमात आहे.त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या सभांना अचानक एवढा ब्रेक लागण्याची नेमकी कारण काय ? कधीपर्यंत मविआ जागावाटप निश्चित होणार?
महाविकास आघाडीतील जागावाटपांच्या बैठकांना ब्रेक लागण्याची कारण काय ??
महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपांची चर्चा करणाऱ्या नेत्यांच्या नियोजित कार्यक्रम आणि दौऱ्यांमुळे बैठका पुढे ढकल्याव्या लागत आहेत.
अशोक चव्हाण जे या महाविकास आघाडीत जागा वाटपांच्या चर्चेत अगदी सक्रिय सहभागी होते, त्यांच्या भाजपच्या जाण्याने एक सावध पवित्रा काँग्रेससह मविआ मधील इतर पक्षांनी घेतल्याने अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर बैठक घेण्यात आलेली नाही.
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाडसह अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसकडून जागा वाटपाच्या समितीमध्ये होते. त्यामुळे आता अशोक चव्हाण ऐवजी चर्चे साठी कोण सहभागी होणार ? यावर निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
आतापर्यंत झालेल्या बैठकीत काँग्रेसची जागावाटपामध्ये अधिकाधिक जागा मिळवण्यावर भर होता. त्यातही विदर्भातील जागांविषयी आग्रही असल्याचा चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका पुढील बैठकीसाठी काहीशी अडचणीची ठरत आहे.
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन त्यांनी दिलेल्या 39 कलमी किमान समान कार्यक्रमावर कुठलाही प्रतिसाद अद्याप महाविकास आघाडीकडून मिळाले नाही. त्यामुळे या संदर्भात सुद्धा पुढील चर्चा होत नसल्याने घटक पक्षांची सुद्धा अडचण झाली आहे.
तिढा निर्माण झालेल्या जागांवर मविआ मधील पक्षांचे प्रमुख चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असा जरी सांगण्यात येत असला तरी याला मुहूर्त लागत नाहीये.
आता या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेला सुद्धा मुहूर्त मिळेनासा झालाय.