एक्स्प्लोर

Mumbai MLA List : मुंबईतील 36 मतदारसंघात कोणाचे आमदार? भाजपचे सर्वाधिक, उद्धव ठाकरेंचे किती? संपूर्ण यादी एका क्लिकवर

Mumbai MLA List : मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्यातरी महायुतीची ताकद जास्त आहे, महायुतीचे मुंबईत 23 आमदार आहेत.

Mumbai MLA List : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपावर चर्चा सुरुच आहे. दरम्यान, दोन ते चार दिवसांनी महाराष्ट्रात आचारसंहिता लागेल आणि निवडणुकीचा बिगुल वाजेल, असे संकेत खुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दिले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जागांवर दोन्ही आघाड्यांमध्ये खल सुरुच आहे. मुंबईत महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष जास्त जागा लढवतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, सध्या मुंबईत कोणाचे किती आमदार जाणून घेऊयात...

2019 महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात शिवसेना-भाजपचा करिष्मा पाहायला मिळाला होता. मात्र निकालानंतर युती तुटली. राज्यात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्यात. त्यानंतर सद्यस्थितीला मुंबईतील 36 मतदार संघामध्ये पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपचे 16 आमदार, शिवसेना शिंदे गट 6, शिवसेना ठाकरे गट 8, काँग्रेस 4, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार आहे. महायुतीचे 23 आमदार मुंबईत आहेत तर महाविकास आघाडीचे 13 आमदार एका अपक्ष आमदारासह मुंबईत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत  मुंबईतील मतदारसंघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

 मुंबईतील 36 आमदारांची संपूर्ण यादी

1. बोरीवली विधानसभा : सुनिल राणे (भाजप)

2. दहिसर विधानसभा : मनिषा चौधरी (भाजप)

3. मागाठणे विधानसभा : प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)

4. मुलुंड विधानसभा : मिहीर कोटेचा (भाजप)

5. विक्रोळी विधानसभा : सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)

6. भांडुप पश्चिम विधानसभा : रमेश कोरगावकर (शिवसेना - उद्धव ठाकरे)

7. जोगेश्वरी पूर्व विधानसभा : रविंद्र वायकर (शिवसेना - एकनाथ शिंदे) : सध्या लोकसभेवर निवड

8. दिंडोशी विधानसभा : सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)

9. कांदिवली पूर्व विधानसभा : अतुल भातखळकर (भाजप)

10. चारकोप विधानसभा : योगेश सागर (भाजप)

11. मालाड पश्चिम विधानसभा : अस्लम शेख (काँग्रेस)

12. गोरेगाव विधानसभा : विद्या ठाकूर (भाजप)

13. वर्सोवा विधानसभा : भारती लवेकर (भाजप)

14. अंधेरी पश्चिम विधानसभा : अमित साटम (भाजप)

15. अंधेरी पूर्व विधानसभा : ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव ठाकरे)

16. विलेपार्ले विधानसभा : पराग अळवणी (भाजप)

17. चांदिवली विधानसभा : दिलीप लांडे (शिवसेना : एकनाथ शिंदे)

18. घाटकोपर पश्चिम विधानसभा : राम कदम (भाजप)

19. घाटकोपर पूर्व विधानसभा : पराग शाह (भाजप)

20. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा : अबू आझमी (समाजवादी पक्ष)

21. अणूशक्तिनगर विधानसभा : नवाब मलिक (राष्ट्रवादी अजित पवार)

22.  चेंबुर विधानसभा : प्रकाश फातर्पेकर (शिवसेना : उद्धव ठाकरे)

23. कुर्ला विधानसभा : मंगेश कुडाळकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)

24. कलिना विधानसभा : संजय पोतनीस (शिवसेना : उद्धव ठाकरे)

25. वांद्रे पूर्व विधानसभा :  झिशान सिद्दीकी (काँग्रेस)

26. वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलार (भाजप)

27. धारावी विधानसभा : वर्षा गायकवाड (काँग्रेस) : सध्या लोकसभेवर निवड

28. सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)

29. वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)

30. माहिम विधानसभा : सदा सरवणकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)

31. वरळी विधानसभा : आदित्य ठाकरे (शिवसेना : उद्धव ठाकरे)

32. शिवडी विधानसभा : अजय चौधरी (शिवसेना : उद्धव ठाकरे)

33. भायखळा विधानसभा : यामिनी जाधव (शिवसेना : एकनाथ शिंदे)

34. मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)

35. मुंबादेवी विधानसभा : अमीन पटेल (काँग्रेस)

36. कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pankaja Munde and Dhananjay Munde : मुंडे बहिण-भावाची ताकद दिसणार, पंकजांच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे हजर राहणार, 12 वर्षानंतर भगवानगडावर एकत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Ajit Pawar : काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Embed widget