Mumbai : उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक मतदार, तर ईशान्य मुंबईमध्ये सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रं; जाणून घ्या मुंबईतील मतदानाची A To Z माहिती
Mumbai Lok Sabha Election : ईशान्य मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 32 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये एकही मतदान केंद्र हे संवेदनशील नाही.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असेलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसल्याचं दिसतंय. मुंबईतील सहा मतदारसंघांतील मतदान संख्येची आकडेवारी (Mumbai Lok Sabha Election Total Voting List) समोर आली असून त्यामध्ये मुंबई उत्तर लोकसभेमध्ये एकूण मतदारांची संख्या सर्वाधिक असून ती 18.12 लाख इतकी आहे. तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजे 14.74 लाख मतदान आहे.
मुंबई लोकसभानिहाय आकडेवारी
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ
- पुरुष मतदार- 9 लाख 68 हजार 983
- महिला मतदार- 8 लाख 42 हजार 546
- तृतीयपंथीय मतदार- 413
- एकूण मतदार- 18 लाख 11 हजार 942
- मतदान केंद्र- 1 हजार 702,
- संवेदनशील मतदान केंद्र- 30
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ
- पुरुष मतदार- 9 लाख 38 हजार 365
- महिला मतदार- 7 लाख 96 हजार 663
- तृतीयपंथीय- 60
- एकूण मतदार- 17 लाख 35 हजार 88
- मतदान केंद्र- 1 हजार 753
- संवेदनशील मतदान केंद्र- 21
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ
- पुरुष मतदार- 8 लाख 77 हजार 855
- महिला मतदार- 7 लाख 58 हजार 799
- तृतीयपंथीय - 236
- एकूण मतदार- 16 लाख 36 हजार 890
- मतदान केंद्र- 1 हजार 682
- संवेदनशील मतदान केंद्र- 32
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
- पुरुष मतदार- 9 लाख 41 हजार 288
- महिला मतदार- 8 लाख 2 हजार 775
- तृतीयपंथीय- 65
- एकुण मतदार- 17 लाख 44 हजार 128
- मतदान केंद्र- 1 हजार 698
- संवदेनशील मतदान केंद्र - 30
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
- पुरुष मतदार- 7 लाख 87 हजार 667
- महिला मतदार- 6 लाख 86 हजार 516
- तृतीयपंथीय मतदार- 222
- एकूण मतदार- 14 लाख 74 हजार 405
- मतदान केंद्र- 1 हजार 539,
- संवदेनशील मतदान केंद्र- 0
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ
- पुरुष मतदार- 8 लाख 32 हजार 560
- महिला मतदार- 7 लाख 3 हजार 565
- तृतीयपंथीय मतदार- 43
- एकुण मतदार- 15 लाख 36 हजार 168
- मतदान केंद्र- 1 हजार 530
- संवदेनशील मतदान केंद्र - 11
मुंबईत 22 हजार पोलिस तैनात
बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस (Police) दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.
ही बातमी वाचा: