एक्स्प्लोर

Udayanraje Bhosale: 'कोणताही विषय असो मी धावून जातो...', मराठा आरक्षण अन् आंदोलनावर उदयनराजे भोसले पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Udayanraje Bhosale: माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं जे योग्य आहे तेच मी योग्य म्हणत असतो, माझी प्रकृती बरी नाहीये म्हणून मी आरक्षणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई: मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करायला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू आहे. काहीही झालं तरी ओबीसीतून आरक्षण घेणार, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानात येत आहेत. भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती सुद्धा केली आहे. 

काय म्हणालेत उदयनराजे भोसले?

माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं जे योग्य आहे तेच मी योग्य म्हणत असतो, माझी प्रकृती बरी नाहीये म्हणून मी आरक्षणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. या आधी मी अंतरवालीला गेलो होतो. शासनाने लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा. जे आंदोलन करतायेत त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा. मला कालच डिस्चार्ज  मिळाला आहे. यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. माझं मुख्यमंत्री यांच्यासोबत अजून बोलणं झालं नाही. मात्र माध्यमांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना विनंती आहे, आंदोलनकर्त्यांसोबत बसून काय तोडगा काढता येईल हे पाहावं. मनोज जरांगे यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं असून आंदोलकांना मूलभूत सुविधा शासनाने पुवाव्यात असं सुद्धा उदयनराजे म्हणाले आहेत.

 शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा

मी याआधी देखील कोणताही विषय असो जे योग्य आहे त्याला योग्य म्हटलं आहे. कोणत्याही परिणामाला मी कधी घाबरलो नाही. माझी प्रकृती बरी नव्हती, परवाच मला डिस्चार्ज मिळाला आहे. आधी मी अंतरवाली सराटीला गेलो होतो. मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा दुसऱ्या कोणताही विषय असो मी धावून जात असतो. शासनाने लवकरात लवकर या सर्व गोष्टींवर तोडगा काढावा. सरकारने आंदोल नातील प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि यातून लवकरात लवकर मार्ग काढावा ही माझी तुमच्या मार्फत मागणी आहे. माझी आणखी एक विनंती देखील आहे, जे आंदोलनकर्ते आहेत यांच्यासोबत लवकरात लवकर बसावं आणि तोडगा कसा काढता येईल आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग कसा निघेल हे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत आणि ते लवकरात लवकर झाला पाहिजे. माझे एवढेच सांगणं आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांच्यावर देखील त्यांचा परिवार अवलंबून आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांची जी काही कमिटी असेल त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, त्या त्यांना पुरवाव्यात असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget