मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान बनवण्यासाठी हालचाली; नितेश राणेंचा आरोप; पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी
Nitesh Rane : मालेगावात नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत त्यांनी पत्र लिहले आहे.
नाशिक : जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी मालेगावात पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. मालेगाव शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची प्रसिद्धी जातीय दंगलीचे शहर म्हणून झाली आहे. त्यामुळे बाहेरचे उद्योग मालेगाव व परिसरात येत नाहीत. मालेगाव शहराचा समतोल विकास साधण्यासाठी व परिसरातील लोकसंख्याचा समतोल साधण्यासाठी नवीन उद्योग येणे गरजेचे आहे. यासाठी मालेगावात नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राणे यांनी केली असून, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहले आहे.
यावेळी राणे यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मालेगाव हे महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील असे तसेच जातीय दंगलीचे केंद्र राहिलेले आहे. शासन दरबारी तसेच पोलीस यंत्रणेकडे सुद्धा या शहराची अशीच नोंद दिसून येते. मालेगाव शहराचा जातीय दंगलींचा इतिहास हा खूप जुना आहे जगभरातील वेगवेगळ्या घटनांचे प्रतिसाद मालेगाव शहरांमध्ये उमटतात तसेच काही वेळेला दंगल नियंत्रणात आणण्याकरता मालेगावमध्ये मिलिटरी ला सुद्धा पाचारण करावे लागले होते. एकंदरीत मालेगाव परिमंडळातील पोलीस अहवालानुसार 2001-2023 मधील एकूण हिंदु –मुस्लिम दंग्याच्या घटना या 188 इतक्या असुन, त्यामध्ये दोन मुख्य बॉम्बस्फोट व अन्य लुटालूट, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दुकान फोडी, घरे जाळणे वस्ती जाळणे, उद्योगांना क्षती पोहोचवणे अशा स्वरूपाच्या घटना नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे मालेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मालेगावात नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी राणे यांनी केली आहे.
मालेगाव जातीय दंगलीचे केंद्र
तर, मालेगाव शहरातील मुख्य व्यवसाय हा पावरलूम हैंडलूम हा असून, तो नागरी वस्तीतूनच चालवल्या जातो. मागील काही वर्षात पीव्हीसी पाईप उत्पादन करणारे काही युनिट मालेगाव औद्योगिक क्षेत्रात सुरू झाले आहेत. पण एकंदरीत लोकसंख्या व लोकसंख्येच्या विस्ताराची गती पाहता ते प्रमाण नगण्य आहे. याला जातीय हिंसाचाराचा इतिहास कारणीभूत आहे. मालेगाव हे महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील असे तसेच जातीय दंगलीचे केंद्र राहिलेले आहे, त्यामुळे मालेगाव शहराचा समतोल विकास साधण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली जात आहे.
मालेगाव छोटा पाकिस्तान बनवण्यासाठी हालचाल
मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान बनवण्यासाठी सर्व प्रकारची हालचाल पूर्ण झाली आहे. तिथे असलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. ड्रग्स आणि अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र तिथे असलेली पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. मालेगावमध्ये कोणताही गुन्हा घडल्यास किमान अडीच तास पोलिसांना पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आम्ही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच मालेगाव शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली असल्याचं नितेश राणे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मंत्रिपदासाठी नितेश राणेंकडून पक्षाची लाचारी, वैभव नाईकांचा राणेंवर थेट हल्लाबोल