'मोदीजी, तुम्ही आजारपणात माझी चौकशी करता पण...; उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण, टाळ्या अन् शिट्ट्या
उद्धव ठाकरेंनी गत महिनाभरापूर्वी धाराशिवमध्ये मुक्कामी राहून संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता.
धाराशिव : निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धाराशिव (Dharashiv) शहरात आज शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा होत असून ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ते धाराशिवच्या मैदानात आले आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच त्यांनी मुक्कामी दौरा करून संपूर्ण जिल्ह्यात सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा शनिवारी सायंकाळी धाराशिवच्या कन्या प्रशालेच्या मैदानावर सभा घेतली. येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला. मोदींनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखती उद्धव ठाकरेंवर व्यक्तिगत प्रेम असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी मोदींना प्रत्युत्तर दिलं. माझ्यावर संकट आलं तर तुम्ही मदतीला याला,मीही सांगतो तुमच्यावर संकट आलं तर हा उद्धव ठाकरे तुमच्या मदतीला धावून येईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी गत महिनाभरापूर्वी धाराशिवमध्ये मुक्कामी राहून संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता. दरम्यान, त्यानंतर आज महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी सभा घेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. चार दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली होती. त्यानंतर आता ठाकरे अखेरच्या टप्प्यात बॅटिंगला उतरत असून, त्यांच्या फटकेबाजीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या सभेत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष आणि उत्साह दिसून आलं.
मी इथे आलोय ते ओमदादा व कैलास दादाच्या निष्ठेवरती, यांच्या कामाच्या जोरावर तुम्हाला भेटायला. मी मत मागायला आलो नाही. मी इथे जुगाड लावायला आलो नाही, मी इथे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. ज्याला म्हणतात ना जनतेनं हातात घेतलेली निवडणूक, ही ती निवडणूक आहे. निवडणूक आयोगाचे कॅमेरे इथे फिरत असतात. अमित शाह यांची
मोदींना तुमचं प्रेम आलाय, मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पुरावा कोण कोणाला देणार, पण मोदीजी काही खरं असेल तर तुमच्या खाल्याच्या माणसांना माहिती नव्हतं काय, असे म्हणत नाव न घेता राज्यातील देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. एकीकडे तुम्ही माझी चौकशी करत असताना, आमच्यातले गद्दार आणि फडणवीस हे रात्री गाठीभेटी करत होते. ह्याचे हातपाय हालत नाहीत, तेव्हा ह्याला खाली पाडण्यासाठी कटकारस्थान करत होते. मोदीजी हे तुम्हाला माहिती नाही का, असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला. तसेच, हा उद्धव ठाकरेही तुमच्यावर काही संकट आलं तर पहिल्यांदा मदतीला धावून जाईल. पण, तुम्हीच संकट म्हणून महाराष्ट्रावर आणि देशावर आला आहात अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदींनी व्यक्त केलेल्या प्रेमावरुन जोरदार हल्ला केला.
तुम्ही बाळासाहेब म्हणू नका ते हिंदू हृदय सम्राट आहे...
मातोश्री मधील खोलीमध्ये अमित शहा ने मला काय शब्द दिले... आणि तुम्ही आता मला खोटे ठरवायला निघाले...
मी तुम्हाला ज शब्द दिले होते ते पूर्ण केले की नाही... मी कर्जमाफी केली की नाही.. महाराष्ट्रात उद्योग आणले की नाही... आणि दुसऱ्या बाजूला मोदीची गॅरंटी बघा... अच्छे दिन आले का.. शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट झाला का..
म्हणून मी मोदींना गजनी सरकार म्हणतो... 2014 मध्ये जे शब्द दिले, ते 2019 मध्ये आठवत नाही आणि 2019 मध्ये जे शब्द दिले ते 2024 मध्ये आठवत नाही....
मोदी म्हणतात काँग्रेस हिंदूंची संपत्ती मुसलमानांना वाटून देईल...
मोदीजी आता आम्ही काय करू तुम्हाला राजकारणात मुलं होत नसेल तर.. म्हणून तुम्हाला दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन फिरायला लागतं आणि त्यांच्यासाठी मत मागावी लागते...
काल अमित शहा आले होते आणि त्यांनी आम्हाला नकली सेना संबोधले.... आज मी त्यांना उत्तर देतो, तुम्ही बेअक्ली आहात...
तुम्ही सतत विचारता, कांदा वरची निर्यात बंदी केव्हा उठेल, माझे म्हणणे आहे पहिले हे सरकार तर उठवा...
अमित शहा तुम्ही मला काल काही मुद्द्यांवर बोलण्याचे आव्हान दिले होते.. सर्व मुद्द्यांवर बोलण्याची माझी तयारी आहे... जर तुमच्यात थोडीशी लाज असेल, तर जनतेच्या प्रश्नावर बोला... केव्हा देणार मराठवाड्याला पाणी??? दहा वर्षात केंद्र सरकारने मराठवाड्याला काय दिलं???
इडी, सीबीआय यांचे घरघडी आहे... मात्र 4 जून नंतर ते सर्व घरघडी आपल्याकडे येणार आहे... शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या इडी, सीबीआय पाहून घेऊ...
नड्डा बोलले होते देशात फक्त एकच पक्ष राहील... नड्डा तुम्हाला माझं सांगणं आहे, तुमचा भाजप यंदा आम्ही औषधालाही सोडणार नाही...