एक्स्प्लोर

MNS : कृषक जमीन अकृषक दाखवून 300 कोटीचा भ्रष्टाचार; मनसेचा आक्रमक पवित्रा घेत गंभीर आरोप  

Nagpur News : कृषक जमीन जाणूनबुजून अकृषक दाखवून त्याची दस्त नोंदणी करून सरकारचा 300 कोटीचा महसूल बुडवनाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मनसेने केली आहे.

Nagpur News : कृषक जमीन जाणूनबुजून अकृषक दाखवून त्याची दस्त नोंदणी करून सरकारचा 300 कोटीचा महसूल बुडवनाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुरात जोरदार आंदोलन केले. 

कृषक जमीन अकृषक दाखवून त्याची दस्त नोंदणी करून नागपूरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयातून तब्बल तीनशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करत अधिकाऱ्यांचा घेराव घालण्यात आला.

अधिवेशन काळात तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा

या घोटाळ्यात गुंठेवारी पद्धतीने जमिनीचे तुकडे पाडून शासनाचा महसूल बुडवला गेल्याचा मनसेचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे गुंठेवारी पद्धतीवर एका प्रकारे सुप्रीम कोर्टाचे निर्बंध असताना ही सर्व नियमाला धाब्यावर बसवून ही नोंदणी करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत असल्याचा मनसेचा आरोप आहे. येत्या सात दिवसात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली नाही, तर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि होणाऱ्या महसूल मंत्री यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे ने दिला आहे.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही. 

वक्फ बोर्डच्या मनमानी कारभारावर चाप कसा बसवणार? - राज ठाकरे

प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको. पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊया.

१) एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. 

२) एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल

३) वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे 

४) आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील 

५) आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल. 

या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही. श्री.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात  ३७० कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो, राज्य सरकारने पण, अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं.

यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी 'भूदान चळवळ' सुरु केली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. 
हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा.. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं.

अशा आशयाची पोस्ट करत राज ठाकरे यांनी या प्रकरणी भाष्य केलं आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget