एक्स्प्लोर

गिरीश महाजन यांनी 1000 कोटींची कामे रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदार नाराज : एकनाथ खडसे

Eknath Khadse On Shinde Government: शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जसजसा उशीर होतोय, तसतशी अस्वस्थता वाढू लागली आहे : एकनाथ खडसे

Eknath Khadse On Shinde Government: शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जसजसा उशीर होतोय, तसतशी अस्वस्थता वाढू लागली आहे. आता ही अस्वस्थता उघडपणे बाहेर पडत असून मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत, टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. तर गिरीश महाजनांनी (girish mahajan) एक हजार कोटींचे काम रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली आहे. यांनी व्हिडीओ एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसवर नेहमी घराणेशाही,  तसेच काँग्रेस घराणेशाहीने बरबटली असा आरोप होत होता. मात्र आता तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun kharge) यांची निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्ष आता सक्षम होईल, अशी अपेक्षाही एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी भुसावळ नगरपालिकेतील (Bhusawal Municipality) नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई केली, खडसे यांचा आरोप 

भुसावळ नगरपालिकेतील (Bhusawal Municipality) खडसे (Eknath Khadse) समर्थक माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांवर सहा वर्षासाठी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना राज्य सरकारचा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी नगरपालिकेतील सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली असून याप्रकरणी शासनाकडे दाद मागितली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिल्याची खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

जिल्हा दूध संघ प्रकरणात पोलिसांना स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत आरोपी म्हणून घोटाळ्यास जबाबदार सर्वांचा उल्लेख केला आहे. मग यात दूध संघाचे सर्व पक्षीय संचालक यांचा ही समावेश होतो का? म्हणजेच हा सर्व पक्षीय घोटाळा आहे, असं म्हणायला हरकत नाही, असेही मत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Latur : तब्बल 16 उद्योजकांना डावलून रितेश-जिनिलियाच्या कंपनीला 10 दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड, महिन्याभरात 120 कोटींचे कर्ज मंजूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget