एक्स्प्लोर

Hingoli : हेमंत पाटील नकोच, हिंगोली आम्ही जिंकून दाखवतो; भाजपच्या आमदाराचा देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोलीची जागा सध्या शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांच्याकडे असून त्या जागेवर भाजपनेही दावा केला आहे. त्यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटला नाही. 

Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभेच्या जागेवरून महायुतीत भाजप आणि शिवसेनेत ओढाताण पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे अर्धा डझन इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिंगोलीची जागा सोडवून घेण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे (Tanhaji Mutkule) यांनी यासंबंधित मोठे दावे केलेत. हिंगोली जिंकण्यासाठी आम्ही तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत, ही जागा भाजप जिंकून दाखवेल असा विश्वास आमदार मुटकुळे यांनी व्यक्त केला. 

भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले की, मागील तीन महिन्यापासून हिंगोलीच्या शिष्ठमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची चार वेळेस भेट घेतली. भाजपची  ही जागा जिंकण्याची तयारी असून त्यांना त्याचं गणित समजवून सांगितलं. मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री हिंगोलीत आले होते तेव्हा 2000 बूथप्रमुखांना हिंगोलीत एकत्र केले होते. त्या दिशेने आमची पूर्ण तयारी आहे आणि मला खात्री आहे ही जागा आम्हालाच म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळेल. 

अडीच वर्षांपासून तयारी सुरू

आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले की, 2019 मध्ये आताचे खासदार हेमंत पाटील आमच्या युतीत निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले  आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. भाजपचा आणि शिवसेनेचा बेबनाव झाला. त्या काळात आम्ही हेरलं की ही जागा आपण सहज जिंकू शकतो. त्या दिवशी आम्ही सर्व नेते मंडळींनी ठराव केला होता की येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा खासदार झाला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या अडीच वर्षाच्या कालखंडात आम्ही तयारीला लागलो होतो, आज आमची पूर्ण तयारी आहे. एका दिवसामध्ये आम्ही पूर्ण प्रचार यंत्रणा उभी करू शकतो. शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि जिल्हा परिषद प्रमुख असे सर्वजण भाजपच्या या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी उतरलो आहोत.

आपण हिंगोलीची जागा कशी जिंकता येऊ शकते हे केंद्रीय नेतृत्वाला पटवून देऊन, त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले.सन 1985 साली तत्कालीन उमेदवार विलासराव गुंडेवार यांनी भाजपकडून ही जागा लढवली होती. त्यावेळी केवळ 15 हजार मतांनी ते पराभूत झाले होते.तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे ही जागा भाजपने लढली पाहिजे, जिंकण्याची शंभर टक्के आमची क्षमता आहे असंही ते म्हणाले. 

हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास युतीचा धर्म आम्ही पाळणार, भाजपचा कार्यकर्ता कधीही बेईमानी करत नाही, पूर्ण ताकदीनिशी आम्ही युतीचा धर्म पाळणार असल्याचं आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्पष्ट केलं. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपासABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सBhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
Video : थारमधील बदमाशांनी पल्सरवरुन चाललेल्या कपलला भर रस्त्यात मधलं बोटं दाखवलं, तरुणालाही मारहाण; संतापलेल्या तरुणीने..
Video : थारमधील बदमाशांनी पल्सरवरुन चाललेल्या कपलला भर रस्त्यात मधलं बोटं दाखवलं, तरुणालाही मारहाण; संतापलेल्या तरुणीने..
Video: मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मॅनेजरला शिवसेनेनं दाखवलं इंगा; हात जोडून मागितली माफी
Video: मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मॅनेजरला शिवसेनेनं दाखवलं इंगा; हात जोडून मागितली माफी
Bhaskar Jadhav : 'मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता, मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जातंय, संधी दिली नाही म्हटलं नाही, पण..'; भास्कर जाधव पुन्हा थेट बोलले!
'मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता, मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जातंय, संधी दिली नाही म्हटलं नाही, पण..'; भास्कर जाधव पुन्हा थेट बोलले!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.