एक्स्प्लोर

श्रीरंग बारणेंची हॅटट्रीक; 96 हजारांचं मताधिक्य घेऊन मावळमधून तिसऱ्यांदा शिवसेनेचा खासदार

गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार यांच्यात थेट लढत झाली होती.

पुणे : जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणून मावळ (Maval) मतदारसंघाकडे पाहिले जाते. मावळ लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना (Shivsena) पक्षाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघोरे यांच्यात थेट लढत होत आहे.  पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या तसेच दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा 54.87 टक्के मतदान झाले. त्यामुळे, घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार, विद्यमान खासदारांना अवघड जाणार की, ठाकरेंच्या उमेदवाराला लाभ होणार हे पुढील काही तासांतच स्पष्ट होईल. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे (Shrirang barne) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह 33 उमेदवार येथील निवडणूक रिंगणात होते. मात्र, बारणे विरुद्ध ठाकरे अशीच लढत या मतदारसंघात झाल्याचं दिसून येतं.  त्यामुळे, मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणेंच्या विजयाची हॅटट्रीक झाली असून 96 हजारांचं मताधिक्य घेऊन ते मावळमधून तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार बनले आहेत. 

मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणेंना 6 व्या मतदान फेरीत 39 हजार 891मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे, मावळमध्ये शिंदेचा जोर असल्याचे दिसून आले. आता सायंकाळी 7 वाजेपर्यंत मावळमधील श्रीरंग बारणेंचा विजय निश्चित झाला असून बारणेंनी 96,615 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग पाटील यांना 5 लाख 96 हजार 217 मतं मिळाली आहेत.

गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार यांच्यात थेट लढत झाली होती. शिवसेना पक्षाला कायम साथ देणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारास नाकारुन येथील जनतेने शिवसेनेच्य बाजुने कौल दिला. मात्र, यंदा प्रथमच येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. पण, नेमकं कोणत्या शिवेसनेच्य बाजुने येथील जनता कौल देणार हे स्पष्ट होत आहे. मावळ मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांपैकी भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. मात्र, शिवसेनेच्या मतांची दोन गटांत विभागणी झाल्याने बारणे यांची भिस्त यंदा भाजप, राष्ट्रवादीवर होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने येथे हवा तेवढा प्रचार केला नाही, किंवा तसा जोर लावला नाही, असा आक्षेप शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून घेण्यात आला आहे.  तर, संजोग वाघेरे ऐन निवडणूक प्रचार कालावधीत अजित पवारांच्या पाया पडले होते, त्यामुळेही बारणेंच्या समर्थकांत वेगळीच चर्चा रंगली होती. 

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मतं
श्रीरंग बारणे  शिवसेना (एकनाथ शिंदे)  
संजोग वाघेरे शिवसेना (उद्धव ठाकरे)  
     

6 विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवार यांचा पराभव करुन दोनवेळा सहजपणे दिल्ली गाठणाऱ्या बारणे यांच्या समोर तिसऱ्या वेळी शिवसेना उमेदवाराचे आव्हान असल्याने ही लढत अटीतटीची ठरली. मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे कर्जतचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे, बारणे यांची भिस्त भाजप, राष्ट्रवादीवरच होती. पनवेलला प्रशांत ठाकूर, चिंचवडला अश्विनी जगताप या भाजपच्या आमदार असून, उरणचे महेश बालदी हे भाजपशी संलग्नीत आहे. मावळला सुनील शेळके आणि पिंपरीत अण्णा बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

मावळमध्ये 54.87 टक्के मतदान, 6 विधानसभा

विधानसभा - मतदान

पनवेल - 50.04 टक्के

कर्जत - 61.39

उरण - 67.07

मावळ - 55.42

चिंचवड - 52.19

पिंपरी - 50.55

10 वर्षांच्या अँटीइन्कम्बन्सीचा फायदा

अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या संजोग वाघेरेंनी ऐनवेळी शिवसेनेतून उमेदवरी मिळवल्याने येथील मतदारसंघात चांगलीच रंगत पाहायला मिळाली. वाघेरेंना पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये नात्यागोत्यांचा आधार असून जुन्या पक्षातील सहकाऱ्यांची मदत घेत प्रचार सुरू केला. महाविकास आघाडीला दोन्ही पक्षाताील फुटींची सहानुभूती आणि गेल्या 10 वर्षांतील अँटीइन्कम्बन्सीचाही फायदा संजोग वाघेरेंना होऊ शकतो. दरम्यान, शेवटच्या आठवड्यात बारणे यांच्या प्रचारासाठी मोठे नेते मैदानात उतरल्याने महायुतीला फायदा होईल असा अंदाज लावला जातो. बारणे आणि वाघेरे हे दोघेही नातलग असून दोघांनीही एकमेकांवर थेट टीका-टिप्पणी टाळल्याचं प्रचारात दिसून आलं. 

बेरोजगारीचा, पाणीपुरवठा व नागरी सुविधांचा प्रश्न

पिंपरी चिंचवडचे वाढते शहरीकरण आणि उद्योगीकरणामुळे नागरी सुविधांच्या अनुषंगाने मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. रेल्वे रुंदीकरण, वाहतूक समस्येचा प्रश्न येथे गंभीर असून स्थलांतरीत होत असलेल्या उद्योगांमुळे बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचंही दिसून येतं. तळेगाव एमआयडीसीमध्ये येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने लघुउद्योजक, स्थानिक बेरोजगार तरुण, छोटे-मोठे व्यावसायिक, स्थानिक मालमत्ताधारक आदींनी संताप व्यक्त केला असून, त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. जनरल मोटर्स कंपनी बंद पडल्याने एक हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच रेडझोन, अनधिकृत बांधकामे, नदीसुधार, पवना बंदिस्त जलवाहिनी, नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget