एक्स्प्लोर

शिंदेंचे श्रीरंग बारणे की ठाकरेंचे संजोग वाघेरे, कोण बाजी मारणार? 113 टेबलवर मतमोजणी होणार!

Lok Sabha Election Result 2024 : पुणे व रायगड जिल्ह्यात विभागलेल्या आणि दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान झाले आहे.

Maval Lok Sabha Election Result 2024 : मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. पुणे व रायगड जिल्ह्यात विभागलेल्या आणि दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार, याचे आखाडे बांधले जात आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे.

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सिंगला  बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, मनिषा तेलभाते, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते.  

येत्या ४ जून रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्षात (स्ट्राँग मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. 

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी १६ टेबल लावण्यात येणार असून २५ फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ टेबल याप्रमाणे एकूण ११३ टेबलवर मतमोजणी होईल. 

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती

मतमोजणीसाठी एकूण १ हजार ५३० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सहा मतदार संघांसाठी ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ९ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ५८ इतर अधिकारी, २०५ सूक्ष्म निरीक्षक, ११८ मतमोजणी पर्यवेक्षक, १७५ मतमोजणी सहाय्यक, ९६ तालिका कर्मचारी यांच्याशिवाय ८६३ शिपाई, हमाल व इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.  

मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच प्राधिकृत माध्यम प्रतिनिधींना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजवाडा गेटने प्रवेश दिला जाईल. १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Ravindra Dhangekar : पत्नीच्या व्यावसायिक जागेवर भाजपने वक्फ बोर्डाचा दावा केला, भीतीपोटी आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
पत्नीच्या व्यावसायिक जागेवर भाजपने वक्फ बोर्डाचा दावा केला, भीतीपोटी आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
Elon Musk on X Cyber Attack: X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
Porsche Car Accident : पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Contract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP MajhaOrange growers Vidarbha : बी आणि सी ग्रेड संत्र्यालाही मिळतोय प्रतिकिलो 22 रुपयांचा दरBeed Crime News : प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाकडून दुकान चालकाला मारहाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Ravindra Dhangekar : पत्नीच्या व्यावसायिक जागेवर भाजपने वक्फ बोर्डाचा दावा केला, भीतीपोटी आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
पत्नीच्या व्यावसायिक जागेवर भाजपने वक्फ बोर्डाचा दावा केला, भीतीपोटी आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
Elon Musk on X Cyber Attack: X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
Porsche Car Accident : पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
आजचा मंगळवार 4 राशींसाठी भाग्यशाली!
आजचा मंगळवार 4 राशींसाठी भाग्यशाली!
Beed Crime Satish Bhosale: लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर
लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर
Vidhan Parishad Election 2025 : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी, 100 हून अधिक अर्ज, एका नावाची जोरदार चर्चा, पण...
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी, 100 हून अधिक अर्ज, एका नावाची जोरदार चर्चा, पण...
Demat Account : शेअर बाजारात नवगुंतवणूकदारांच्या एंट्रीचा वेग मंदावला, डीमॅट खात्याबाबत फेब्रुवारीतील धक्कादायक आकडे समोर, दोन वर्षांची...
नवगुंतवणूकदारांच्या एंट्रीचा वेग मंदावला, डीमॅट खात्याबाबत फेब्रुवारीतील धक्कादायक आकडे, दोन वर्षांची...
Embed widget