एक्स्प्लोर

Manoj Jarange : गुडघाभर पाणी भरलेल्या शेतातून मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंना फोन

Manoj Jarange Call Dhananjay Munde , जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज (दि.4) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Manoj Jarange Call Dhananjay Munde , जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज (दि.4) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव येथे पाहणी करताना मनोज जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाच फोन लावला. यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी त्यांना केली. दरम्यान सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिल्याचे देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  घनसावंगीमध्ये बोलताना याबाबत भाष्य केलं आहे. 

मनोज जरांगे काय काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला कशात राजकारण करायचं नाही. दुसरा कोणी असता तर त्यांना डायरेक्ट बोलला असता. मला कोणत्याही गोष्टीत राजकारण करायचं नाही. सध्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  कृषीमंत्री आहेत. त्यांनी सध्या एक शब्द वापरलाय. आम्ही सरसकट नुकसान भरपाई देणार आहोत. म्हणजे पंचनामेही केले जाणार नाही. म्हणजे कोणाची पाईपलाईन वाहून गेली असेल तर पंचनामे होणार आहेत. आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहोत. त्यांनी 10 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देऊ, असं सांगितलं आहे. नाही दिली भरपाई दिली तर मनोज जरांगे रस्त्यावर उतरेल. त्यांची काळजी नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. 

आम्हाला आमचा शेतकरी वाचवायचा आहे, जगवायचा आहे

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही. आम्हाला आमचा शेतकरी वाचवायचा आहे, जगवायचा आहे. याच्यामध्ये कोणताही जातीवाद नाही. त्यांचा फोन लागत नाही. आपण त्याचा गैरअर्थ काढला नाही. आपण अर्थ काढला की, ते काहीतरी कामात असतील. प्रत्येक वेळेस राजकारण करायचं आणि आडवं बोलायचं या धंद्यात मी पडत नाही. कामात असले तर 100 टक्के माणूस परत कॉल करतो. त्यांनी माघारी कॉल केला होता. त्यांनी आता शब्द दिलाय. तो शब्द त्यांना पाळावा लागणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत मिळवणार आहोत. मदत नाही दिली तर राज्यातील शेतकरी मी रस्त्यावर आणेन. यांना जगणे सुद्धा मुश्किल करेन. माझ्या शेतकऱ्याचा जीव चाललाय, असंही मनोज जरांगे पाटील या वेळी बोलताना म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंनी काँग्रेसचा एकनिष्ठ नेता लावला गळाला, मावळमध्ये घडामोडींना वेग, अजितदादांचा पक्ष काँग्रेसला धक्का देणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget