एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : तुमच्या मुलीचं ऐकून सागर बंगला सोडत नाही, तुझं लेकरु बघतो तसं इतर लेकरांना बघ, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

Manoj Jarange Patil : आमचं उपोषण खोटं बोलून उठवलं, आम्ही तुमचं म्हणणं मानल होतं. पण तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढला. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी CM देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. 

जालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही हतबल झाला होता, रडकुंडीला आला होता, याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय. मात्र आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमान होऊ लागला आहात. तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. पण तुमची मस्ती जायला तयार नसल्याचे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. 

सागर बंगल्यावरून  (Sangar Bunglow) मुलीच्या परीक्षेसाठी वर्षावर जाता येत नाही तुम्ही म्हणाले. तुम्हाला तुमच्या पोरीच्या भवितव्याची चिंता आहे. इकडे आमच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत. आमचं उपोषण खोटं बोलून उठवलं, आम्ही तुमचं म्हणणं मानल होतं. पण तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढला. मराठा आरक्षणासाठी आज 4 आत्महत्या झाल्या. तुमचं लेकरू बघता तसे राज्यातील इतर लेकरांना बघा,  मुलीसाठी नजीकच्या बंगल्यात राहायला जात नाही. सागरवरून वर्षा बंगल्यावर जाता येत नाही. तुमच्या मुलीचं ऐकून ज्याप्रमाणे सागर बंगला सोडत नाही, जसं तुझं लेकरु बघतो तसं इतर लेकरांना ही बघा, असा घणाघातही मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यावर केला आहे. 

येत्या 15 तारखेपासून बेमुदत साखळी उपोषण 

आता आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. राज्यातील मराठे कणखरपणे लढाई लढणार आहेत. आज 12 -13 दिवस झालेत. देवेंद्र फडणीस यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यामार्फत निरोप दिला होता की , आम्ही तात्काळ मागणी मान्य करू.  मात्र आज त्या घटनेला 13 दिवस झाले आहेत. पण अजून शिंदे समिती सक्रिय केली नाही, प्रक्रिया अजून सुरू केली नाही, तसेच गॅजेट सुद्धा घेतलं नाही. SEBCचा विषय होता त्याचा निर्णय आजुन घेतला नाही. त्यामुळे केवळ उपोषण सोडण्यापर्यंत हे असं करत आहेत का? सरकार जाणून बुजून फसवणूक करायला लागलंय. त्यामुळे येत्या 15 तारखेपासून आम्ही अंतरवालीसराठी येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करतोय. याची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू, असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.  

मराठ्यांनी ठरवले तर जगाची मुंगी सुद्धा हलणार नाही- मनोज जरांगे पाटील 

मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्हाला कोणीच बोलायचे नाही का? दहशतवादी अड्डे चालवतो का? मला हलक्यात घेऊ  नका. आता आम्ही रस्त्यावर लढणार असल्याचा निर्धार ही मनोज जरांगे यांनी केला आहे.सत्ता आल्यापासून यांनी काय केलं. आज पावणेदोन वर्षापासून हेच गृहमंत्री आहे. तरीही केसेस मागे नाहीत. पण मुख्यमंत्री आता हे चालणार नाही. धनंजय मुंडे यांच्यासारखी तुमची जी टोळी आहे, तिला पण फिरू देणार नाही. तुम्ही आमच्या समाजाचा अपमान करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. सत्ता आणि दरारा इथे मराठ्यांचा आहे. मराठ्यांनी ठरवले तर जगाची मुंगी सुद्धा हलणार नाही. असेही मनोज जरांगे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget