एक्स्प्लोर

उमेदवारी यादी निघण्यापूर्वी भाजपचा आमदार मध्यरात्रीनंतर अचानक मनोज जरांगेच्या भेटीला, अंतरवाली सराटीत काय घडलं?

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. 

जालना : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली होती. महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा सुपडा साफ करणार, असा इशारा दिला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही जोरदार टीका केली. यानंतर महायुतीतील महत्त्वाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. त्या पाठोपाठ आता भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. 

सुरेश धस मध्यरात्रीनंतर अचानक मनोज जरांगेच्या भेटीला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, मनोज जरांगे यांची मनधरणीचे प्रयत्न महायुतीच्या नेत्याकडून केल्या जात असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.रात्री एक वाजता सुरेश धस हे अंतरवलीत दाखल झाले. यावेळी जवळपास अर्धा  तास या दोघात  बातचीत झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटित काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा

अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) हे मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं चर्चेत आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी यापूर्वी टीकेची झोड उठवली होती. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे अजय महाराज बारस्कर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजय महाराज बारस्कर यांनी मद्यधुंद तरुण मनोज जरांगे यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी बारस्कर यांच्या घरातून संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget