एक्स्प्लोर

' मी 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जाणार, देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का?' मनोज जरांगेंनी दंड थोपटले, म्हणाले..

पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकोटला भेटीही दिल्या. मनोज जरांगे पाटील हे  1 सप्टेबरला राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार आहेत.

Jalna: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकोटला भेटीही दिल्या. आता मी १ सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जोणार आहे, देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का?असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दंड थोपटले आहेत. जालन्यातून ते माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील हे  1 सप्टेबरला राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार आहेत.  छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.  

राजकोट किल्ल्यावर जायला देवेंद्र फडणवीस  अडवणार आहेत का?

राजकोटवर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने सर्व जनतेच्या भावना दुखावल्या असून त्या ठिकाणी जाऊन मी पहाणी करणार आहे. असे जरांगे म्हणालेत. राजकोट किल्ल्यावर जायला देवेंद्र फडणवीस अडवणार आहेत का? असा सवाल करत राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करु नका, उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे असं म्हणत हे काम करणाऱ्याला शोधून जेलमध्ये टाकलं पाहिले असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरल्याचं दिसून आलं.

मिस्त्रीला तुरुंगात टाका, कोणत्याही महापुरषाचं काम...

उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, ज्यानी काम निट केलं नाही त्याला शोधून काढलं पाहिजे. त्याला आधी जेलमध्ये टाका. कोणत्याही महापुरुषाचं बांधकाम नीटच केलं पाहिजे. असं जरांगे म्हणालेत. आम्ही तिथे जाऊन पहाणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते संवेदनशील ठिकाण आहे का ?ती बॉण्ड्री आहे का भारत पाकिस्तानची?  उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष काम करणारा नीट नसल्यावर... तो मिस्त्री शोधून काढला पाहिजे, त्याला मध्ये टाकले पाहिजे. 1 तारखेला जाणार आहे, ते 600 किमी अंतर आहे. असंही ते म्हणाले.

"फडणवीस चालता चालता फसवतो..'' मनोज जरांगे

.राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघातप्रकरणी जालन्यातून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा टीकेची झोड उठवली असून आम्ही राजकोटला जाणार असून देवेंद्र फडणवीस रोखणार आहेत का? असा सवाल त्यांनी केलाय. आरक्षणाचा गनिमीकावा ओळखू देणार नाही असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी डाव टाकतात, चालताचालता फसवतात असा आरोप त्यांनी केलाय. ज्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मोदी साहेब महाराष्ट्रातून गेले होते त्या शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात झालेलं नाही, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधल्याचे दिसले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Shambhuraj Desai : साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता, शंभूराज देसाई एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?
सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना 3 सदस्यांवरुन 15 वर कशी पोहोचली? शंभूराज देसाईंनी सेनेचा प्रवास मांडला

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget