एक्स्प्लोर

'कामं सोडून आज येऊ नका', मनोज जरांगे कधी करणार भूमिका जाहीर? म्हणाले, 'आज छोटी बैठक, निवडणूकीच्या तारखा..'

मराठा समाज २९ ऑगस्ट २०२३ रोजी एकत्र आला होता. आज त्या दिवसाची वर्षपूर्ती असल्याचं सांगत राज्यातील मराठा समाजानं एकत्रित येणं गरजेचं असल्याचं जरांगे म्हणाले.

Manoj Jarange: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूकांचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे 288 पाडणार की नाही याबाबत भूमिका नेमकी कधी मांडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आज काम सोडून कोणीही येऊ नका असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणालेत. आज छोटी बैठक असून विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यावर  भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आंतरवली सराटीमधून ते माध्यमांशी बोलत होते.

मराठा समाज २९ ऑगस्ट २०२३ रोजी एकत्र आला होता. आज त्या दिवसाची वर्षपूर्ती असल्याचं सांगत राज्यातील मराठा समाजानं एकत्रित येणं गरजेचं असल्याचं सांगत राज्यातील पावणेदोन कोटी मराठा ओबीसी आरक्षणात गेले असल्याचं जरांगे म्हणाले.

मी जातीयवादी नाही, आरक्षण मागतोय...

 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसह विधानसभेत २८८ पाडायचे की नाही यावर बोलताना दिसत आहेत. राज्यात मराठा आरक्षण कार्यकर्ते याबाबत महाविकास आघाडीसह मराठवाड्यात येणाऱ्या नेत्यांना भूमिका मांडत आहेत. दरम्यान आज त्यांनी मराठा समाजाला एकत्र राहण्यासाठी विनंती केली. ते म्हणाले, "गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला . त्याला आपण जबाबदार आहोत. मी जातीवादी नाही ,मी आरक्षण मागतोय. तुम्ही एकत्र आल्यामुळे मराठा समाजाला अख्ख जग आपल्याकडे पाहतेय. श्रीमंत मराठा पासून गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करू लागलेत. मराठा समाज एकत्रित करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वाया जाऊ देणार नाही."

जरांगे कधी मांडणार भूमिका?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणाबाबत आणि विधानसभा निवडणूकांच्या बाबतीत जरांगे कधी भूमीका मांडणार? विधानसभेत किती उमेदवार उतरवायचे यासंदर्भात ते जी बैठक घेणार होते ती बैठक पुढे ढकलल्याने जरांगे त्यांची भूमिका कधी मांडणार? असा प्रश्न उपस्थित होत असून निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यावर यावर भूमिका मांडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीची वर्षपूर्ती

29 ऑगस्ट 2023 मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील पैठण फाटा या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन सुरू केलं,याच दिवशी मनोज जरांगे यांनी दुपारी एक वाजेपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा असे अल्टिमेट देत आमरण उपोषणाचा इशारा दिला.आणि 4 वाजत जवळच असलेल्या अंतरवली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; सोमवारी 'वंदे भारत'ची चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; सोमवारी 'वंदे भारत'ची चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 14 Spet 2024 : 10 AMABP Majha Headlines : 10 AM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 सप्टेंबर 2024 : ABP MajhaMVA Seat Sharing : मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत EXCLUSIVE माहिती, 6 जागांवरून रस्सीखेचीची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; सोमवारी 'वंदे भारत'ची चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; सोमवारी 'वंदे भारत'ची चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Eknath Khadse on Majha Katta : भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
MVA Seat Sharing for Mumbai: मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा झळाळी! एकाच दिवसात चांदी तब्बल 4400 रुपयांनी तर सोनं 1000 रुपयांची महाग 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी! एकाच दिवसात चांदी तब्बल 4400 रुपयांनी तर सोनं 1000 रुपयांची महाग 
Embed widget