एक्स्प्लोर

Video : नाशिकमधून मनोज जरांगेंची मोठी घोषणा; बालेकिल्ल्यात भुजबळांना इशारा, थेट कॉलर उडवली

नाशिकमधील मराठा समाजाने आज कॉलर टाईट केली आहे, असं म्हणताना उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही कॉलरला हात लावून दाखवली.

नाशिक  : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये (Nashik) आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. तर, दुसरीकडे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळालं. शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील  मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात झाली. तपोवन जुना आडगाव नाका -निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत झाले. नाशिकमधील रॅलीत जरांगे यांनी अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाही केल्याचं पाहायला मिळालं. 

मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये आज उदयनराजेस्टाईल कॉलर उडवून दाखवली. नाशिकमधील मराठा समाजाने आज कॉलर टाईट केली आहे, असं म्हणताना उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही कॉलरला हात लावून दाखवली. नाशिक हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, नाशिकवर भुजबळाचं नाव लिहिलंय का, भुजबळ अन् फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, निडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार, आगामी विधानसभेला 288 जागांवर उमेदवार उभे करणार असून पुढचं सरकार आमचंच येणार, असे भाकीतही मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे यांनी नाशिकमधून आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाच केली असून 288 जागांवर उमेदवार उभा करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले. यावेळी, जरांगे यांनी नाशिककरांनी माझी कॉलर टाईट केलीय, असेही ते म्हणाले. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकांमध्ये जरांगेंच्या नेतृत्वात आता उमेदवार उभे राहणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. 

जरांगेच्या रॅलीच्या भुजबळ फार्मवरील सुरक्षेत वाढ

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मची सुरक्षा वाढवण्यात आली. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले असून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

हेही वाचा

Supreme Court: ...अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भीत इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Embed widget