एक्स्प्लोर

Manmohan Singh Death : पाकिस्तानत जन्म, केंब्रिज विद्यापीठात शिक्षण, रिजर्व्ह बँकचे गव्हर्नर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थशास्त्राचे व्याख्याते; मनमोहन सिंहांची डोळे दिपवणारी कारकि‍र्द

Manmohan Singh Death : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले, वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंग हे भारताचे चौदावे पंतप्रधान होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख  होती. पंतप्रधान पदावर असलेले पहिले शीख म्हणून मनमोहन सिंह यांच्याकडे पाहिलं जायचं. सिंग हे जवाहरलाल नेहरूंनंतरचे पहिले पंतप्रधान होते जे पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा निवडून आले होते.

मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी श्री गुरुमुख सिंह आणि श्रीमती यांच्या कुटुंबात झाला होता. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतातील अमृतसरला गेले. मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग या 3 मुली आहेत.

मनमोहन सिंह यांची शैक्षणिक कारकिर्द

मनमोहन सिंह यांनी हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतले. ते एक जिज्ञासू आणि अभ्यासू विद्यार्थी होते.  शैक्षणिक कारकि‍र्दीसह ते नेहमी प्रथम क्रमांकावर राहिले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी अनुक्रमे 1952 आणि 1954 मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
1957 मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी मिळवली आणि 1962 मध्ये त्यांनी डी.फिल. नफिल्ड कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात. 

पीएचडीसाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश, तिथे राइट्स पुरस्काराने सन्मान

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या नेफिल्ड कॉलेजमधून डी.फिल परीक्षा उत्तीर्ण

चंदीगड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही शिक्षक म्हणून काम पाहिलं

जगातील कुशल अर्थशास्त्र म्हणून ओळख

त्यानंतर ते भारतात परतले आणि 1966 - 1969 या काळात संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेसाठी काम करण्यासाठी गेले.

1969 मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक झाले. 1972 मध्ये, मनमोहन सिंग हे वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार होते आणि 1976 मध्ये ते वित्त मंत्रालयात सचिव होते. 1980 - 1982 मध्ये मनमोहन सिंग नियोजन आयोगावर होते आणि 1982 मध्ये त्यांची माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतर, ते 1985 ते 1987 पर्यंत भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले. 1991 मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनले आणि परिणामी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.

मनमोहन सिंग यांची व्यावसायिक कारकीर्द

 1957-1959 या कालावधीत अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केले.
1963 ते 1965 या काळात प्राध्यापक होते.
1966 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक होते.
 1966 ते 1969 पर्यंत UNCTD सोबत काम केले.
 1969 ते 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राध्यापक म्हणून काम केले.
मनमोहन सिंग यांची श्री ललित नारायण मिश्रा यांनी विदेश व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. 
1969 साली दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते.
 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले.
1976 मध्ये अर्थ मंत्रालयात सचिव होते
1976 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते.
1976-1980 या कालावधीत मनमोहन सिंह भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते.
1976-1980 या कालावधीत मनमोहन सिंह भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक होते.
1982-1985 या कालावधीत मनमोहन सिंह यांनी RBI चे गव्हर्नर म्हणून काम केले.
1985-1987 या कालावधीत मनमोहन सिंह यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
1987-1990 या कालावधीत मनमोहन सिंह दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते.
1991 मध्ये केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.
2004 ते 2014 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते.

मनमोहन सिंग यांनी 1964 मध्ये इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ - सस्टेन्ड ग्रोथ नावाचे पुस्तक लिहिले. त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manmohan Singh : अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget