एक्स्प्लोर

Mahayuti Seat Sharing: बैठकांवर बैठका, तिढा कायम; महायुतीच्या जागावाटपाचं भिजत घोंगडं, दिल्ली दरबारी तोडगा निघणार?

Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांसोबत ऑनलाईन चर्चा झाली.

Mahayuti Seat Sharing: मुंबई : महायुतीतला जागावाटपाचा तिढा (Mahayuti Seat Sharing News) काही सुटत नाहीये. काल रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर (Chief Minister Varsha Residence) महायुतीची बैठक झाली. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत तोडगा मात्र निघालाच नाही अशी सूत्रांची माहिती आहे. आज पुन्हा बैठक होणार आहे, आणि उद्या महायुतीचे नेते अमित शाहांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय. शाहांसोबतच्या बैठकीतच जागावाटप निश्चित होईल असंही कळतंय. दरम्यान, काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), गिरीश महाजन (Girish Mahajan), सुनील तटकरे (Sunil Tatkare), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) उपस्थित होते. 

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्ली दरबारी 

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांसोबत ऑनलाईन चर्चा झाली. या बैठकीत अमित शाहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतल्याचं समजतं. अमित शाह महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा एकदा चर्चा करुन जागावाटपाचा पेच सोडवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी महायुतीच्या जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

कोणत्या जागांवर पेच कायम? 

मनसे महायुतीत सामील होणार? 

लोकसभेचं बिगुल वाजलं पहिल्या टप्प्यासाठी आचारसंहिताही जाहीर झाली. मात्र, असं असलं तरीदेखील अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. सध्या मनसे महायुतीत दाखल होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या भेटीत अमित शहांनी राज ठाकरेंचा दोन जागां प्रस्ताव फेटाळून एक जागा देणं शक्य असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर काल राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर आता राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आता महायुतीसोबत जायचं की नाही? याचा संपूर्ण निर्णय राज ठाकरेंवर सोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जर राज ठाकरेंनी महायुतीसोबत जाण्याचं ठरवलं, तर शिंदेंना त्यांच्या वाट्याची एक जागा गमवावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. जर मनसे महायुतीसोबत आली, तर दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्याचा भाजपचा मनसुबा असल्याचं बोललं जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget