एक्स्प्लोर

Mahayuti : महायुतीत वरिष्ठ नेत्यांमध्ये दोस्ती, पण स्थानिक नेत्यांमध्ये कुस्ती; चिपळूण - संगमेश्वर विधानसभेच्या जागेवरून वाद चिघळला

Mahayuti, Chiplun-Sangameshwar : विधानसभा निवडणुकीची नांदी लागलेली असताना राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच संघर्ष पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळतंय.

Mahayuti, Chiplun-Sangameshwar : विधानसभा निवडणुकीची नांदी लागलेली असताना राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच संघर्ष पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळतंय. कोकणात चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीतील तीनही पक्ष आपसात लढू लागल्याने नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार शेखर निकम हे या मतदार संघातून आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांत आधी या जागेवर दावा ठोकला. अशातच मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी निर्धार मेळावा घेत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शवलीये.  महायुती मधील दोन महत्त्वाचे पक्ष आपसात दावे प्रति दावे करत असतानाच आता भाजपने देखील यामध्ये थेट उडी घेतलीये.  

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवार संगमेश्वर मधीलच पाहिजे, भाजपच्या स्थानिक नेत्याची मागणी 

संगमेश्वर मधील भाजपचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष असलेले प्रमोद अधटराव  यांनी तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवार संगमेश्वर मधीलच पाहिजे अशी मागणी करत भाजप देखील इथून लढण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. महायुती मधील या घरोब्यात जागा वाटपावरून निर्माण झाल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरणात  कंदाल झाल्याचे चित्र सध्याच्या स्थितीवरून निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडीनंतर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात राजकीय हालचालींना नव्याने वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेली सीट खेचून आणण्यात शिवसेनेला आणि भाजपला कितपत यश मिळतं हे पाहणे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे. 

विद्यमान आमदार शेखर निकम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हे दोघेही पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये शेखर निकम यांच्याकडून झालेला पराभव सदानंद चव्हाण यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे पराभवाची परतफेड करण्यासाठी सदानंद चव्हाण यांनी जाहीर मेळावा घेत निर्धार केला आहे. महायुती मधील या संघर्षाचा नेमका फायदा कोणाला होणार आणि नुकसान कोणाचे होणार याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

2019 मध्ये मतदार संघात काय झाले?

सध्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या शेखर निकम यांच्या राजकीय वर्चस्वाबाबत बोललं जातं. तसं म्हटलं तर चिपळूण - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची विशेषत: ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नाकारून चालणार नाही. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांना 1 लाख 1 हजार 578 मतं मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा पराभव केला होता. चव्हाण यांना 71 हजार 654 मतं मिळाली होती. 2 लाख 69 हजार 322 मतदारांपैकी 1 लाख 75 हजार 624 मतदारांनी म्हणजे 66.1 टक्के इतकं मतदान या विधानसभा मतदार संघात झाले. पैकी 57.8 टक्के मतं निकम यांना तर 40.8 टक्के मतं ही चव्हाण यांना मिळाली. पण, सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर चिपळूण - संगमेश्वर या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. मुख्यबाब म्हणजे जागा कुणाला मिळणार? हे पाहावं लागणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Dharashiv : विधानसभेची खडाजंगी : धाराशिवमध्ये 4 विधानसभा मतदारसंघ, महायुती की महाविकास आघाडी कोणाचं पारडं जड?

 


 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget