Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस; विविध लक्षवेधी सूचना सभागृहात मांडल्या जाणार
Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून, पुरवणी मागण्यांवरील चर्चा अपेक्षित आहेत.
LIVE

Background
Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस (Maharashtra Winter Session 2025) असून, पुरवणी मागण्यांवरील चर्चा अपेक्षित आहेत. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर आरोप होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भातील लक्षवेधी सूचना काल उत्तर न मिळाल्याने पुढे ढकलण्यात आली होती. ही लक्षवेधी आज पुन्हा सभागृहात मांडली जाणार असून, यावर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सत्ताधारी आमदार बोलणार आहेत. विधान परिषदेत आज 260 अन्वये सुरू असलेल्या चर्चेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची संधी मिळेल. तसेच, आज खास बैठक आयोजित करण्यात आली असून विविध लक्षवेधी सूचना सभागृहात मांडल्या जातील. (Maharashtra Winter Session Nagpur 2025)
Mumbai Police: मरीन ड्राइव पोलिसांची मोठी कामगिरी; कोट्यवधींचे दागिने चोरून फरार झालेल्या मोलकरीणला दागिन्यांसह केली अटक
मरीन ड्राइव पोलिसांची मोठी कामगिरी
कोट्यवधींचे दागिने चोरून फरार झालेल्या मोलकरीणला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी चोरी केलेल्या दागिन्यांसह अटक केली
वृध्द महिलेची घरात येऊन देखभाल करणाऱ्या मोलकरीणीनेच घरातून कोट्यवधी रुपयांचे दागिने केले होते चोरी
चोरी केलेले ३ कोटी ५६ हजारांचे दागिने गेले होते चोरीला.. त्यांपैकी १ कोटी २७ लाख ३१ हजारांचे दागिने मोलकरणी कडून पोलिसांनी केले जप्त..
आरोपी अर्चना सुनील साळवी या ४४ वर्षीय महिला अवघ्या काही महिन्यांसाठी वृध्द महिलेच्या घरी देखभाल करण्यासाठी आली होती..
8 महिन्यांच्या सखोल चौकशी नंतर पोलिसांनी पुराव्यासह चोरी केलेल्या मोलकरीणीला अटक केली..
मरीन ड्राईव्ह पोलिस या गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे याची तपासणी करत आहेत..
Beed News: बीड ते वडवणी लोहमार्गावर स्पीड रेल्वे चाचणी; रेल्वे चाचणी दरम्यान स्थानिकांच्या भावनिक प्रतिक्रिया
बीड ते वडवणी रेल्वे लोहमार्गाचा टप्पा पूर्णत्वास झाल्याने आज या लोहमार्गावर स्पीड रेल्वे चाचणी घेतली जातेय. 32 किलोमीटर अंतराच्या लोहमार्गावर 130 किलोमीटर प्रति वेगाने रेल्वे चाचणी करण्यात आली. आम्ही लहानपणापासून या रेल्वेची वाट पाहत होतो. आज अखेर 40 वर्षानंतर हे स्वप्न अर्धवट पूर्ण झाले असून पुढे परळी पर्यंत रेल्वे धावावी अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे हे स्वप्न होते केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या मार्गाचे काम पूर्ण होत आहे. आता परळी आणि मुंबईपर्यंत रेल्वे धावावी. इतर ठिकाणी भाजीपाला रेल्वेने जात आहे. मात्र आमच्याकडे ती सोय नाही. रेल्वे धावल्यास याचा मोठा फायदा इथल्या लोकांना होईल अशी अपेक्षा इथले स्थानिक व्यक्त करत आहे.























