ध्रुव राठीची महाराष्ट्रासाठी 'मिशन स्वराज्य' मोहीम, आदित्य ठाकरेंनीही चॅलेंज स्वीकारलं!
यूट्यूबर ध्रुव राठीने एक्स या समाजमाध्यमावर एक व्हिडीओ करून महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरेंनी ध्रुव राठीचा हा व्हिडीओ शेअरे केला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) मतदानाला अवघे पाच दिवश बाकी आहेत. 18 नोव्हेंबरनंतर प्रचाराच्या तोफा तंडावणार आहेत. म्हणूनच राज्यातील सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. या प्रचारादरम्यान, नेतेमंडळी जनतेला अनेक आश्वासनं देत आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट यूट्यूबर ध्रुव राठीने (Dhruv Rathee) दिलेलं 'मिशन स्वराज्य' हे आव्हान स्वीकारलं आहे. राज्याच्या विकासाचं हे आव्हान आम्ही स्वीकारत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं?
आदित्य ठाकरे यांनी एक्स या समाजमाध्यमावर मिशन स्वराज्यबाबत सविस्तर सांगितलं आहे. मविआ म्हणून नेमक्या ह्याच (ध्रुव राठीने सांगितलेल्या) उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो, हे काम आत्ताच्या सत्ताधार्यांनी कपटाने थांबवले. हे आव्हान स्वीकारण्यासारखं आहे, म्हणून आम्ही त्याला स्वीकारलेलं नाही. उलट या आव्हानात जे सांगण्यात आलं आहे, तेच आम्हाला करायचंय. हे सगळं आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंनी कोणकोणते आव्हान स्वीकारले?
1.शेतकऱ्यांना मदत - प्रशिक्षण, मृदा परीक्षण, बियाणे बँक, स्थानिक बाजारपेठा
2.पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग)
3.मोफत उत्तम शिक्षण, मोफत उत्तम आरोग्यसेवा
4.शुद्ध हवा आणि पाणी
5.सर्व नागरिकांची सुरक्षितता
6.स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) विकास
7.सर्वांसाठी रोजगार
Mission Swaraj: exactly what we had embarked on as MVA, and was stopped by this regime.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 15, 2024
Accepting the challenge, not just because it’s a challenge worth accepting but also it is exactly what we seek to do, and what our state needs.
चला महाराष्ट्र, हे पण करून दाखवूया ! Challenge… pic.twitter.com/02h9K8wF7X
ध्रुव राठीने नेमकं काय चॅलेंज दिलं आहे?
ध्रुव राठीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक साधारण दोन मिनिटांचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत ध्रुव राठी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत, असं सांगितलंय. यासह ध्रुव राठीने कोणकोणत्या क्षेत्रात विकास व्हायला हवा, तेही सांगितलंय.
..त्या नेत्याला, पार्टीला मी लोकांपर्यंत घेऊन जाईन
विशेष म्हणजेच त्याने उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर जो नेता काम करेल, आश्वासन देईल, त्या नेत्याला, पार्टीला मी लोकांपर्यंत घेऊन जाईल. माझ्या चॅनेलवरचे साधारण अडीच कोटी लोक या नेत्यांना अटीशर्तींसह पाठिंबा देऊ. नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्या या खुल्या ऑफरचा लाभ घ्यावा. मात्र संबंधित नेता किंवा पार्टीचे सरकार आल्यावर मी त्यांना केलेल्या विकासकामांबाबत जाबही विचारणार आहे, असं ध्रुव राठीने आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये म्हटलंय. ध्रुव राठीचं हेच चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे.
हेही वाचा :