महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र, 270 जागांवर एकमत, बैठकीत काय झालं? संजय राऊतांनी सगळं सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांच्या नेतृत्वात आमची शेवटची बैठक झाली आहे. आमचेा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. 270 जागांवर आमचे एकमत झालं आहे.
Mahavikas Aghadi press conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांच्या नेतृत्वात आमची शेवटची बैठक झाली आहे. आमचेा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. 270 जागांवर आमचे एकमत झालं आहे. उरलेल्या जागा मित्रपक्षांना देणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचं जागावाटप सुरळीत झाल्याचे राऊत म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाच्या मुद्यावरुन चर्चा सुरु होती. अखेर आज यावर तोडगा निघाला आहे. 85-85-85 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. 270 जागांवर एकमत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन राजकीय पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासमोर झाली. 85-85-85 या जागांवर मिळून एकूण 270 जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित 18 जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल, असं नाना पटोले म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची यादी जाहीर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकांसाठी 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यामध्ये विदर्भातील फक्त सात मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केले आहे. गेले काही दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विदर्भातील जागांसाठी काँग्रेस सोबत संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत होते. शिवसेना ठाकरे गट विदर्भातील जागांसाठी आग्रही आहे, असे सांगितले जात होते. मात्र शिवसेनेच्या यादीमध्ये विदर्भातील मेहकर, बाळापुर, अकोला पूर्व, वाशिम, बडनेरा, रामटेक आणि वणी या सात मतदारसंघांमध्येच शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या सात जागांवरच शिवसेनेची बोळवण करण्यात आली आहे? की आणखी काही जागा शिवसेनेला मिळतील हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. विशेष म्हणजे जेव्हा शिवसेना ठाकरे गट भाजपसोबत महायुतीत निवडणूक लढवत होता तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला 12 ते 14 मतदारसंघ येत होते. मात्र महाविकास आघाडीत ती संख्या अर्ध्यावर आली आहे का? असा प्रश्न आजच्या यादीनंतर निर्माण झालाय.
महत्वाच्या बातम्या: