Maharashtra Vidhan Parishad election Result : तिसरा उमेदवार उभा करून मविआने काय मिळवलं? काय गमवलं?

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Nikal Live updates : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महयुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत.

प्रज्वल ढगे Last Updated: 13 Jul 2024 07:08 AM
Maharashtra Vidhan Parishad Election Result : तिसरा उमेदवार उभा करून मविआने काय मिळवलं? काय गमवलं?

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत  महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. तिसरा उमेदवार उभा केला नसता तरीदेखील महायुतीची 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकून आले असते. म्हणजेच निवडणूक घेतली असली तरीही अपेक्षित असाच निकाल लागला आहे. 

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका, देवेंद्र फडणवीसांची कळी खुलली, म्हणाले...

विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election)महायुतीने मोठा विजय मिळवलाय. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे. धानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका, देवेंद्र फडणवीसांची कळी खुलली, म्हणाले...सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

काँग्रेसची 8 मतं फुटली, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का, ठाकरे-पवारांना मतं फोडण्यात अपयश

विधानपरिषद निवडणुकीचे निकाल (Vidhan Parishad Election) हाती येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागेवर अजूनही जोरदार लढत सुरु आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.  सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्ये

काँग्रेसची 8 मतं फुटली, फडणवीसांची जादू कायम, पंकजा मुंडे सभागृहात परतल्या; विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

VidhanParishad Election Result 2024: चुरशीच्या लढाईत ठाकरेंच्या राईट हँडने बाजी मारली

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आणि सर्वपक्षीयांशी सुमधूर संबंध राखून असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शुक्रवारी  पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत राजकीय चमत्कार करुन दाखवला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

Milind Narvekar : शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव

Milind Narvekar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीकडील 64 मतांचा विचार केला असता त्यांची पाच मतं फुटली आहेत. मविआसोबत असलेल्या शंकरराव गडाख आणि विनोद निकोले या दोन आमदारांची मतं मोजली असता. मविआकडील एकूण 7  मतं फुटल्याचं समोर आलं आहे. 

Jayant Patil : माझी 12 मतं मला मिळाली, काँग्रेसची काही मतं फुटली, जयंत पाटील संतप्त

माझी 12 मतं मला मिळाली असून काँग्रेसची काही मतं फुटली असल्याचं शेकापचे जयंत पाटील म्हणाले. 

MLC Election : काँग्रेसनं दिलेल्या सूचनांचं पालनं केलं : झिशान सिद्दीकी

MLC Election : काँग्रेसनं दिलेल्या सूचनांचं पालन केलं असल्याचं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे. प्रज्ञा सातव यांच्या विजयाचा आनंद असल्याचं देखील सिद्दीकी म्हणाले. 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महाविकास आघाडीची 5 मतं फुटली

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महाविकास आघाडीच्या एकूण मतांपैकी 5 मतं फुटली आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण 64 मतं होती. त्यापैकी प्रज्ञा सातव यांना 25, मिलिंद नार्वेकर यांना 22 आणि जयंत पाटील यांना 12 मतं मिळाली.

Parinay Fuke : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार : परिणय फुके

विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटतील असा दावा विजयानंतर परिणय फुके यांनी केला आहे. 

Chandrakant Patil : मविआकडे मतं नसताना उमेदवार दिले : चंद्रकांत पाटील

जर मविआने उमेदवार उभा नसता  केला तर झाकली मूठ राहिली असती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी

 Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी 


विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार 
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत 
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे  
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर 

Eknath Shinde : तुमच्या विकेट पडतच राहणार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde :  विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या विकेट पडत राहणार असल्याचा टोला लगावला. 

Jayant Patil : पिछाडीवर पडलेल्या जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडलं, महायुतीचा जल्लोष

मतमोजणीमध्ये पहिल्यापासून शेकपाचे जयंत पाटील पिछाडीवर होते.पिछेहाट दिसत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडले आहे. सविस्तर बातम्या क्लिक करा

Pankaja Munde : आईचा आशीर्वाद, डोळ्यात पाणी; पंकजा मुंडेंच्या विजयानंतर प्रीतम मुंडे भावूक, समर्थकांचा जल्लोष

तब्बल 10 वर्षांनी पंकजा मुंडेंसाठी (Pankaja munde) विजयाचा गुलाल उधळण्यात आला असून मुंडे कुटुंबीयांसाठी हा भावनिक क्षण आहे. त्यामुळेच, खासदारकीला पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर दु:खी झालेल्या प्रीतम मुंडेंच्या (Pritam munde) डोळ्यात आज आनंदाश्रू पाहायला मिळाले. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

Ajit Pawar : मोठी बातमी : अजित पवारांचे दोन्ही उमेदवार जिंकले, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा 

Maharashtra Legislative Council Election : प्रज्ञा सातवांचा विधान परिषद निवडणुकीत विजय, पण काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा!

Maharashtra Legislative Council Election : काँग्रेसची मतं फुटल्याने एक प्रकारे महाविकास आघाडीलाच या निवडणुकीमध्ये धक्का बसल्याची चर्चा आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याची चर्चा आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा


Ajit Pawar: 'आमची मते होती 42 पंरतु आम्हाला 47 मते पडली...', दोन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?

आमची मते 42 होती, पंरतु आम्हाला 47 मते पडली आहेत. ज्यांनी आमच्या उमेदवारांनी मते दिली त्यांचे मी आभिनंदन करतो, असं अजित पवार म्हणाले. सविस्तर बातमी साठी क्लिक करा

Pankaja Munde : माझ्या विजयाचा आनंद माझ्या लोकांना : पंकजा मुंडे

Pankaja Mudne : माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय याचा फार आनंद आहे.  जिथे जास्त योगदान देऊ शकेन तिथं चांगलं काम करेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकांच्या चेहऱ्यांकडून पाहून आनंद वाटतोय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Ajit Pawar : आम्हाला पाच मतं अधिक मिळाली, त्यांचे आभार : अजित पवार

Ajit Pawar : विधानपरिषद निवडणुकीत आमच्याकडे 42 मतं होती. आम्हाला 47 मतं मिळाली आहेत. आम्हाला अधिकची 5 मतं मिळाली. त्यांचे आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले. 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकणार : अजित पवार

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. महायुती विधानसभा निवडणुकीत देखील अशाच रणनीतीनुसार विजय मिळवणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

Maharashtra Vidhan Parishad Election : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, मिलिंद नार्वेकर अन् जयंत पाटील यांच्यात चुरस

Vidhan Parishad Election : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर अन् जयंत पाटील यांच्यात चुरस आहे.  

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी

 Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. सदाभाऊ खोत देखील विजयी झाले आहेत. 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीचे 9 उमेदवार मतं विजयी होतील : गिरीश महाजन

महायुतीचे नऊ उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : दोन जागा, तीन उमेदवारांमध्ये टक्कर, नार्वेकर, सदाभाऊ खोत अन् मिलिंद नार्वेकर कोण जिंकणार?

 Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates :  महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे , भावना गवळी आणि कृपाल तुमाने विजयी झाले आहेत. 

Bhavana Gavali : शिवसेनेच्या भावना गवळी 24 मतं मिळवत विजयी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी 24 मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. 

Pradnya Satav : काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या 25 मतं मिळवत विजयी

Pradnya Satav : काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या 25 मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. 

Krupal Tumane : एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने विजयी झाले आहेत. त्यांना 25 मतं मिळाली आहेत. 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी : सुनील तटकरे

 Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates :  राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे निवडणूक लढवत होते. राजेश विटेकर यांना 23 मतं मिळाली आहेत.

Milind Narvekar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयापासून एक मत दूर

Milind Narvekar :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयापासून एक मत दूर आहेत.

Pankaja Munde : भाजपच्या पंकजा मुंडे आणि परिणय फुके विजयी

भाजप उमेदवार पंकजा मुंडे, परिणय फुके आणि योगेश टिळेकर विजयी झाले आहेत. पंकजा मुंडे यांना 26, परिणय फुके यांना 26, योगेश टिळेकर यांना 26 मतं मिळाली आहेत. 

Jayant Patil : शेकापच्या जंयत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडलं..

Jayant Patil : शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडलं आहे. 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live : भाजपचे योगेश टिळेकर यांचा 23 मतं मिळवून विजय

 Maharashtra Vidhan Parishad election Result Live :


परिणय फुके : 20


राजेश विटेकर : 21


अमित गोरखे : 22


शिवाजीराव गर्जे :20


पंकजा मुंडे :18


मिलिंद नार्वेकर :17


प्रज्ञा सातव :19


सदाभाऊ खोत : 10


कृपाल तुमाने : 16


भावना गवळी : 10


योगेश टिळेकर : 23


जयंत पाटील : 06

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : विधानपरिषदेला भाजप विजयाचं खातं उघडणार?

 Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates  : भाजपचे पुण्यातील उमेदवार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) आणि अमित गोरखे (Amit Gorkhe) विजयाजवळ पोहोचले आहेत. योगेश टिळेकर आणि अमित गोरखेंना 22 मतं मिळाली आहेत. 

BJP Yogesh Tilekar : भाजपचे योगेश टिळेकर विजयाजवळ

Yogesh Tilekar : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार योगेश टिळेकर हे विजयाजवळ पोहोचले आहेत.  23 चा कोटा असून ते 22 मतांपर्यंत पोहोचले आहेत. 

Jayant Patil Votes : शेकापच्या जयंत पाटील यांना 6 मतं

Jayant Patil : शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना 6 मतं मिळाली आहेत. तर सदाभाऊ खोत यांना 9 मतं मिळाली आहेत. 

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांना 17 मतं, पंकजा मुंडे यांना किती?

काँग्रेसच्या पंकजा मुंडे यांना 17 मतं मिळाली आहेत. पंकजा मुंडे यांना 10 मतं मिळाली आहेत. सदाभाऊ खोत यांना 9 मतं मिळाली आहेत.

Milind Narvekar : ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना 17 मतं

Milind Narvekar  : ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना 17 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 14 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांना 12, कृपाल तुमाने यांना 12 मतं मिळाली आहेत. 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : भाजपच्या पंकजा मुंडे यांना 10 मतं

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : भाजपच्या पंकजा मुंडे यांना 10 मतं मिळालेली आहेत. कृपाल तुमाने यांना 11 , योगेश टिळेकर यांना 13 मतं मिळाली आहेत.

Maharashtra Vidhan Parishad election Result Live : समान पसंतीक्रम नोंदवल्यानं एक मत बाद

 Maharashtra Vidhan Parishad election Result Live : समान पसंतीक्रम नोंदवल्यानं एक मत बाद  झालं आहे. प्राधान्यक्रम सारखाच नोंदवल्यानं एक मत बाद झालं आहे.

Pankaja Munde : प्राथमिक माहितीनुसार भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना 7 मतं

Pankaja Munde :  भाजपचे प्रमुख उमेदवार पंकजा मुंडे यांना ७ मतं आणि परिणय फुके ५  मतं मिळाली आहेत. 

Maharashtra Vidhan Parishad Election Result : एका मतपत्रिकेवरुन गोंधळ, अमित गोरखेंना मिळालेलं मत

एका मतपत्रिकेवरील इंग्रजी आकड्यावरुन गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वपक्षीय निरीक्षक या मतपत्रिकेवरुन आक्रमक झालेले आहेत. इंग्रजी आकड्यावरुन सर्वपक्षीय निरीक्षक आक्रमक झाले आहेत. ते मत भाजपच्या अमित गोरखेंना मिळालेलं होतं. 

Maharashtra MLC Election Result : मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, योगेश टिळेकर यांची आघाडी

मिलिंद नार्वेकर -८ 


कृपाल तुमाने - ३


जयंत पाटील - १ 


शिवाजीराव गर्जे - ८


प्रज्ञा सातव - १० 


अमित गोरखे - ४


पंकजा मुंडे - १


राजेश विटेकर - ८


योगेश टिळेकर - ११

Maharashra MLC election result Counting live : मिलिंद नार्वेकरांची घौडदोड सुरु

Maharashra MLC election result Counting live : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांची मतमोजणी सुरु झाली आहे. प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकरांची घौडदोड सुरु आहे. प्रज्ञा सातव यांना 7 तर मिलिंद नार्वेकर यांना 6 मतं मिळाली आहेत.

Vidhanparishad Election Result: विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात.

पहिलं मत योगेश टिळेकर यांना, दुसरं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव गर्जे यांना मिळाले आहे. 

विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येकी 25 मतांचे 11 गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. आता पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल. त्याआधारे विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल.

Maharashra MLC election result voting live : सर्व 274 आमदारांचे मतदान पूर्ण, आता निकालाची प्रतीक्षा, कोणाचा पत्ता कट होणार?

Vidhan Parishad election Live Updates : बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मतदान बाकी होते. आता या तिन्ही आमदारांनी मतदान केले आहे. त्यानंतर आता सर्व 274 आमदारांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत पराभूत होणारा 12 वा उमेदवार कोण, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Vidhan Parishad election Live Updates : बविआच्या तिन्ही आमदारांचे मतदान बाकी, नेमकं कोणाच्या नावावर मारणार शिक्का?

एकूण 274 आमदारांपैकी 271 आमदारांनी मतदान केलं आहे. आता बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मत बाकी आहे. त्यामुळे आता या तिन्ही आमदारांना चांगलेच महत्त्व आले आहे. या आमदारांच्या भूमिकेवरच 11 व्या उमेदवाराचा जय-पराजय अवलंबून असू शकतो. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे तिन्ही आमदार कोणाला मतदान करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही आमदार सध्या भाजपाच्या कार्यालयात आहेत. 

Parishad Election Result Live : विधानपरिषदेच्या निकालाकडे सर्वांच लक्ष, उद्धव ठाकरेंचा प्लॅन यशस्वी ठरणार?

Vidhan Parishad election Live Updates :  विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आतापर्यंत 254 आमदारांनी मतदान केलं असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. पुढच्या काही तासांत निकाल लागणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांचा विजय व्हावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खास प्लॅनिंग केलं होतं. तसेच शेकापचे जयंत पाटील यांनीही आपल्या विजयासाठी आमदारांना मतदानाचे आवाहन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

मोठी बातमी! गणपत गायकवाड यांना मतदान करण्याची परवानगी, निवडणूक आयोगाचा निर्णय

Ganpat Gaikwad Voting allowed by Election Commission : भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी


रमेश कदम तुरुंगात असतानाही त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता त्याच धर्तीवर गणपत गायकवाड यांना परवानगी

Sanjay Raut meeting Chandrakant Patil संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटल यांना टोला, समोरासमोर येताच बोट वर करून म्हणाले "माझी लाईन कधी चुकत नाही"

संजय राऊत आणि चंद्रकांत दादा पाटील यांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली. या भेटीमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले मी तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो. त्यावर संजय राऊत यांनीदेखील हसत हसत राऊतांची भेट घेतली. तसेच माझी लाईन कधी चुकत नाही, असे राऊत मिश्किलपणे म्हणाले. 

Ajit Pawar and Jayant Patil Meeting : मोठी बातमी! हातात हात अन् हळू आवाजात संवाद, अजित पवार-जयंत पाटील यांच्या भेटीची चर्चा!

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान चालू असताना आज विधानभवन परिसरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले. त्यानंतर काही सेकंदांसाठी या दोघांनीही संवाद साधला. एकमेकांच्या हातात हात देऊन या दोघांनी हळू आवाजात संवाद साधला. या संवादात नेमकी काय चर्चा झाली, याची चर्चा आता होत आहे.

Raju Patil : मनसेच्या एकमेव आमदाराचं मत नेमकं कुणाला, राजू पाटलांचे मतदान अद्याप बाकी!

Vidhan Parishad election Live :  दुपारी दीड वाजेपर्यंत भाजपच्या सर्व १०३ आमदारांचे मतदान पूर्ण


भाजप समर्थक ८ आमदारांनी केले मतदान


मनसेचे राजू पाटील व बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मतदान शिल्लक

Kailas Gorantyal : काँग्रेसच्या सर्व आमदारांचे मतदान होताच कैलास गोरंट्याल यांचा शायराना अंदाज, म्हणाले "रातभर दिल की..."

काँग्रेसच्या सर्व ३७ आमदारांनी आज मतदान केले


त्यानंतर काँग्रेस आमदार कैलास गोरांट्याल यांची शायरी


रातभर दिल की धडकने जारी रहती है


सोते नहीं है हम


जिम्मेदारी रहती है

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला अतिरिक्त मतं मिळण्याची शक्यता, कोणाचा पराभव होणार?

MLC election result live : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अतिरिक्त मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


एकूण आमदार - ३८ 


अपक्ष आमदार - ९


एकूण - ४७ मतं

Aditya Thackeray Voting : आदित्य ठाकरे मतदानाला निघाले, सोबत शंकरराव गडाख  

Vidhan Parishad election 2024 : आदित्य ठाकरे मतदान करायला निघाले आहेत. त्यांच्यासोबत शंकरराव गडाख, नितीन देशमुख, उदयसिंह राजपूत हेदेखील मतदान करायला निघाले आहेत.

Ganpat Gaikwad Voting : गणपत गायकवाड अद्याप वेटिंगवरच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष!

केंद्रीय निवडणूक आयोगाचा रिप्लाय न आल्याने गणपत गायकवाड वेटिंगवर


केंद्रीय निवडणूक आयोगाचा रिप्लाय आल्यानंतर गणपत गायकवाड मतदान करणार


काँग्रेसने तक्रार केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार पाठवण्यात आलेली आहे


मात्र अद्याप निकाल न आल्यानं गणपत गायकवाड मतदान केंद्राच्या बाहेर वेटिंगवर

Eknath Shinde and Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या येण्याने ताकद वाढली, एकनाथ शिंदेंकडे किती अपक्ष आमदार?

शिवसेना शिंदे गटाचे एकूण 38 आमदार असून त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांचे 2 अशा 9 आमदारांचं समर्थन असल्यानं त्यांचे संख्याबळ 47 झाले आहे.

Ajit Pawar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मतदान पूर्ण

Vidhan Parishad election Live Updates :  अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 40 आणि दोन अपक्ष अशा एकूण 42 आमदारांनी मतदान केले. 

Eknath Shinde MLA Voting : एकनाथ शिंदेंच्या आमदारांचं मतदान पूर्ण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण 


शिवसेना ठाकरे गटातील आमदारांचे मतदान बाकी आहे.

Hiraman Khoskar : मोठी बातमी! हिरामन खोसकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

BJP MLA Voting : आतापर्यंत भाजपाच्या 97 आमदारांचे मतदान पूर्ण  

 MLC election voting live :आतापर्यंत भाजपाच्या 97 आमदारांनी मतदान केले आहे. 


आता मतदान करण्यासाठी आमदार रांग लावत आहेत.

Ajit Pawar NCP MLA Voting : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 37 आमदारांचे मतदान पूर्ण, तीन आमदार अद्याप बाकी

राष्ट्रवादीच्या 37 आमदारांचे मतदान पूर्ण 


मतदान बाकी असलेले आमदार


१) आदिती तटकरे २) संजय बनसोडे ३) अजित पवार

Vidhan Parishad election Live Updates : मतदानासाठी आमदारांची रांग वाढली, नाना पटोले, उदय सामंत, दादाजी भुसे रांगेत उभे

मतदानासाठी आमदारांची रांग वाढली 


नाना पटोले, उदय सामंत, दादाजी भुसे, के सी पाडवी रांगेत उभे

Shahajibapu Patil : मोठी बातमी! शहाजीबापू मतदान करणार, विधानभवनात दाखल

Vidhan Parishad election 2024 : शहाजीबापू पाटील यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यामुळे ते मतदानासाठी येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शहाजीबापू न आल्यास निवडणुकीच्या समीकरणात नेमका काय बदल होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता प्रकृती बरी नसूनही शहाजीबापू पाटील मतदानासाठी आले आहेत. 

Shahajibapu Patil : मोठी बातमी! शहाजीबापू मतदान करणार, विधानभवनात दाखल

Vidhan Parishad election 2024 : शहाजीबापू पाटील यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यामुळे ते मतदानासाठी येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शहाजीबापू न आल्यास निवडणुकीच्या समीकरणात नेमका काय बदल होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता प्रकृती बरी नसूनही शहाजीबापू पाटील मतदानासाठी आले आहेत. 

Shahajibapu Patil : मोठी बातमी! शहाजीबापू मतदान करणार, विधानभवनात दाखल

Vidhan Parishad election 2024 : शहाजीबापू पाटील यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यामुळे ते मतदानासाठी येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शहाजीबापू न आल्यास निवडणुकीच्या समीकरणात नेमका काय बदल होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता प्रकृती बरी नसूनही शहाजीबापू पाटील मतदानासाठी आले आहेत. 

Zeeshan Siddique : काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचं मत नेमकं कुणाला? समोर आली मोठी माहिती!

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी नाराज आहेत. त्यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आळे होते. मात्र आता झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली. मला कालच्या बैठकीत बोलावण्यात आले नाही. याचे मला दु:ख आहे. पण काँग्रेस पक्ष मला जे सांगेल ते मी करणार आहे. सध्या दु:ख  व्यक्त करण्याची वेळ नाही. मी काँग्रेसच्या कार्यालयात जाईल, तेव्हा मी दु:ख व्यक्त करेल. पण सध्या पक्ष सांगेल ते मी करणार आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.

Abu Azmi Voting : अबू आझमी, रईस शेख जयंत पाटलांच्या भेटीला, कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष

अबू आझमी आणि रईस शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला पोहोचले


समाजवादी पक्ष आज कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष 

Vidhan Parishad election Live Updates : सकाळी 11 वाजेपर्यंत 124 आमदारांचे मतदान पूर्ण, कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष

सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण 124 आमदारांचे मतदान झाले आहे. यामध्ये भाजपाच्या 90 आमदारांचा समावेश आहे. दुसरीकडे एक-एक आमदार येऊन मतदान करत आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या मतांचे योग्य पद्धतीने नियोजन केलेले आहे.  

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या 25 आमदारांचं मतदान पूर्ण, अजित पवार स्वतः मतदानावर लक्ष ठेवून!

राष्ट्रवादीच्या 25 आमदारांनी आत्तापर्यंत मतदान केलं 


अजित पवार त्यांच्या दालनात भेटूनच आमदार मतदान करण्यासाठी रवाना 


अजित पवार स्वतः मतदानावर लक्ष ठेऊन

मोठी बातमी! दोन अपक्ष आमदार ठाकरेंच्या आमदारांसोबत, विनोद निकोले, शंकरराव गडाख नार्वेकरांना मतदान करणार

माकपचे डहाणूचे आमदार विनोद निकोले हे शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांसोबत आयटीसी ग्रँड इथे पोहोचले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत. त्यासोबतच  क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख आणि माकप विनोद निकोले हे दोन अपक्ष आमदार ठाकरेंसोबत आहेत. 


 

Ambadas Danve on Ganpat Gaikwad Voting : निवडणूक आयोग भाजपाचा सालदार, घरगडी; गणपत गायकवाडांच्या मतदानावरून अंबादास दानवेंची टीका

हा सत्तेचा दुरुपयोग आहे. आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. अनिल देशमुख यांच्यावर आरोप होते. गणपत गायकवाड यांनी स्वत:च्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. हे सगळ्या जगाने पाहिलं होतं. अनिल देशमुख यांना त्यावेळी मतदानाला येऊ दिले नव्हते. पण आज गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी दिली असेल तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे. निवडणूक आयोग बायस आहे का? हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे, असे दानवे म्हणाले. 


निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली त्यांच्या घरचा सालदार, बटिक, घरगडी असल्यासारखे काम करत आहे, हे स्पष्ट होत आहे. सत्तेचा बेमुर्वतखोरपणे केलेला हा वापर आहे. आम्ही आमचा विरोध निवडणूक अधिकाऱ्यांना कळवला आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. 

Anil Deshmukh on Ganpat Gaikwad Voting : "मला परवानगी दिली नव्हती पण...", गणपत गायकवाड यांच्या मतदानावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया !

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावर प्रतिक्रिया दिली. माझ्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यावेळीदेखील निवडणूक होती. त्यावेळी मी परवानगी मागितली होती की मला मतदानाची परवानगी. द्यवी मात्र कोर्टाने मला परवानगी दिली नव्हती. भाजपने मात्र लोअर कोर्टाच्या माध्यमातून दबाव टाकून गणपत गायकवाड यांच्यासाठी परवानगी मागून घेतली आहे, असं देशमुख म्हणाले.

Ganpat Gaikwad Voting : गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून राजकारण तापलं, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांची माहिती-


गणपत गायकवाड यांच जर मतदान यादीत नाव असेल तर त्यांना मतदान करता येईल


गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही किंवा कोर्टाने अद्याप सजा सुनावलेली नाही


त्यामुळे त्यांना मतदान करता येईल 


तरीही राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे. 

Sanjay Kute on Ganpat Gaikwad voting : अनेक आमदारांनी तुरुंगात असताना मतदान केलं, गायकवाड 100 टक्के मतदान करणार- संजय कुटे

मला काँग्रेसची कीव येते. ठाकरे गटाचे संजय राऊत यांचीही मला कीव येते. गणपत गायकवाड यांना मतदान करण्याचा अधिकार नाहीत, असं ते सांगत आहेत. आतापर्यंत विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत बऱ्याच आमदारांनी तुरुंगात असताना मतदान केलेलं आहे. हा इतिहास आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांना मतदानाचा अधिकार आहे. तुरुंगात असला तरी लोकप्रतिनिधी मतदान करू शखतो. ते 100 टक्के मतदान करतील, असे भाजपाचे आमदार संजय कुटे म्हणाले. 

Shahajibapu Patil : शिंदे गटाचे शाहाजी बापू आजारी, मतदानाला येण्याबाबत प्रश्नचिन्ह; एका मतामुळे नेमका काय ट्विस्ट येणार?

शिवसेनेकडे एक मत अतिरिक्त आहे


अशात शिवसेनेचे फायरब्रँड नेते शहाजी बापू हे आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत


शहाजी बापू मतदानाला येणार का ?


शहाजी बापू मतदानाला आले तर शिवसेनेच्या अतिरिक्त मताचा फायदा कुणाला होणार ?

Ganpat Gaikwad Voting : भाजपाचे गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसची मागणी

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये


काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांनी लिहिले पत्र


लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत


त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसची मागणी

MLC election voting live : 30 पेक्षा अधिक आमदारांचं मतदान पूर्ण, मतदान करणारे सर्वाधिक आमदार भाजपचे

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत तीसहून अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. आतापर्यंत सर्वाधिक भाजपाच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Nawab Malik Voting : नवाब मलिक यांचं मतदान कोणाला? मोठी माहिती आली समोर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवाब मलिक मतदान करणार? 


नवाब मलिक सध्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसह अजित पवार यांच्या दालनात उपस्थित 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून टप्प्या टप्प्याने आमदारांना मतदान करण्यासाठी पाठवण्यात येत आहे


राष्ट्रवादीकडून दिलीप बनकर, प्रकाश सोळंके किरण आणि किरण लहामटे आणि नवाब मलीक मतदानासाठी रवाना

Dilip Walse Patil Vidhan Parishad election : महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील, घोडेबाजार होण्याची शक्यता नाही

महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील 


त्या अनुषंगाने आम्ही आखणी केली आहे


ह्यावेळी घोडे बाजार होईल असे वाटत नाही


सर्व पक्षांची मतं निश्चित आहेत


जे मत सरप्लस असतील तर ते मत येऊ शकते


फोडाफोडीचे राजकारण करायची गरज नाही


कोण हारेल हे सांगणं अवघड आहे


आमदारांना काही सूचना द्यायच्या होत्या
म्हणून त्यांना हॉटलवर नेण्यात आले होते


महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील यात शंका नाही

Vidhan Parishad election Live : मतदानाला सुरुवात, 9 आमदारांनी केले मतदान

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता एक-एक आमदार येऊन मतदान करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 9 आमदारांनी मतदान केले आहे.   

Atul Bhatkhalkar on MLC election result voting : आमचे नऊ उमेदवार निडवून येणार, अतुल भातखळकर यांना विश्वास

आमचे नऊ उमेदवार निडवून येणार आहेत. याबाबत आम्हाला विश्वास आहे, असे भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. 

Bacchu Kadu on Vidhan Parishad Election : एकनाथ शिंदेंचे एकही मत फुटणार नाही, बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलं

विधानपरिषदेच्या निवडणुकीवर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकही मत फुटणार नाही. आम्ही दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत आहोत. आजही मी त्यांच्यासोबत आहे. आम्ही शिंदे यांच्यासोबत जाऊन मतदान करणार आहोत. 

Vijay Wadettiwar on Vidhan Parishad Election : आमचे आमदार फुटल्याचा जावईशोध कोणी लावला, आमचे सर्व आमदार आमच्यासोबत- विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आमचे नऊ आमदार फुटणार हा जावईशोध आणला कोठून. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर खोट्या बातम्या पसवरवल्या जात आहेत. आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. ज्यांना भीती आहे ते हॉटेलमध्ये पळून गेले. त्यांनी हॉटेलचा आश्रय घेतला. आमचे सर्व आमदार आपापल्या घरी होते. आमचे महाविकास आघाडीची तीनही उमेदवार निवडून येतील. आमच्यात कुठेही गडबड नाही. 

Vidhan Parishad election 2024 : अजित पवार गटाकडून जोरदार फिल्डिंग, धनंजय मुंडे अनिल पाटील निवडणूक प्रतिनिधी 

अजित पवार गटाचे निवडणूक प्रतिनिधी 


धनंजय मुंडे 


अनिल पाटील


मतमोजणी प्रतिनिधी 


चेतन तुपे
संजय खोडके

Eknath Shinde Shivsena MLA : दोन्ही उमेदवांच्या विजयासाठी शिंदेंच्या आमदारांची रंगीत तालीम, मतदानाबाबत मार्गदर्शन

शिवसेना आमदारांची विधानपरिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम काल ताज लँड हाॅटेलला पार पडली


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरपर्यंत थांबून आमदारांना मार्गदर्शन केले


मतदान कसे करावे, मतदान कसे बाद होऊ शकते याची माहिती आमदारांना देण्यात आली


पहिल्या पसंतीची मत कुणाला दुसऱ्या पसंतीची मतं कुणाला, याबाबतही मार्गदर्शन आमदारांना करण्यात आले


आजच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भावना गवळी व कृपाल तुमाने हे उमेदवार आहेत

Bacchu Kadu on Vidhan Parishad Election : बच्चू कडू नेमकं कोणाला मतदान करणार, खुद्द त्यांनीच सांगितलं!

बच्चू कडू या निवडणुकीत कोणाला मतदान करणार, असे विचारले जात होते. याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आमच्यासह अपक्ष आमदारांची मतंही शिंदेसाहेबांसोबत आहेत, असे कडू म्हणाले.

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू शिंदे गटाच्या आमदारांसोबत

आमदार बच्चू कडू हेदेखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. ते सध्या शिंदे गटाच्या आमदारांसोबत हाॅटेल ताज लँड्स एन्डमध्ये आहेत. 

दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी शिंदेंच्या सेनेचा नेमका प्लॅन काय? जाणून घ्या...

Deepika Kesarkar : विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीयय आमच्याकडे या निवडणुकीत 1 मत अतिरिक्तआहे. त्यामुळे आमच्या दोन जागा सहज निवडून येत आहेत. खबरदारी म्हणून आम्ही 1 मत अतिरिक्त ठेवलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

MLC election result voting live : मोठी बातमी! काँग्रेसचे 9 आमदार फुटले? मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याची सूत्रांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी काँग्रेसचे 5 आमदार फोडले तर भाजपकडूनदेखील काँग्रेसचे 4 आमदार फोडण्यात आले. 


काँग्रेसचे एकूण 8 आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार 


विधानपरिषदेच्या निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे स्वतःचे 40 आमदार 2 अपक्ष मी काँग्रेसच्या चार आमदारांची अशी एकूण 46 मतं 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार फर्स्ट प्रेफरन्स मध्येच निवडून येण्याची दाट शक्यता

Ajit Pawar : अजित पवारांच्या आमदारांसाठी विशेष ट्रॅव्हल्स, सर्व आमदार आमदार विधानभवनाकडे निघाले!

Ajit Pawar : अजित पवार यांचे आमदार विधानभवनाकडे निघाले आहेत. आमदारांसाठी एका विशेष ट्रॅव्हल्सची सोय करण्यात आली आहे.

Ajit Pawar on Vidhan Parishad election : आमचाच उमेदवार विजय होईल, अजित पवार यांना विश्वास

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा आता तयारी चालू झाली आहे. आमदार हळूहळू विधानसभेत येत आहेत. दरम्यान, आमचा उमदेवार विजयी होणार, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. चार वाजेपर्यंत सर्वकाही स्पष्ट होईल, असे अजित पवार म्हणाले. 

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांनी दादर येथील घरी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन

काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी आज निवडणुकीपूर्वी दादर येथील घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या मुलांनी औक्षण केले.

Milind Narvekar : मतदानाची वेळ वाढवा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी, पण अद्याप कोणताही प्रतिसाद नाही

Vidhan Parishad election Live Updates : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे.  पाऊस असल्यामुळे मतदान एक तास वाढवावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मागणी केली होती. पण आम्हाला त्याबाबत काही कळविण्यात आले नाही. 9 ते चार मतदानाची वेळ आहे. त्यात वाढविण्यात यावी ही मागणी होती. पुर्वी ९ ते ५ ची वेळ असायची त्याप्रमाणे वेळ वाढवावी अशी मागणी केली होती, असे नार्वेकर म्हणाले.

Amit Gorkhe : भाजपाचे विधानपरिषदेचे उमेदवार अमित गोरखे यांनी सिद्धीविनायकाच्या चरणी

BJP Amit Gorkhe : भाजपाचे विधानपरिषदेचे उमेदवार अमित गोरखे यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. आज होणाऱ्या निवडणुकीत विजयी कामगिरी व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली.  

Sharad Pawar NCP MLA : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार किती, जाणून घ्या नावे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार


१) जयंत पाटील (इस्लामपूर) 
२) जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा) 
३) अनिल देशमुख (काटोल) 
४) बाळासाहेब पाटील (उत्तर कराड) 
५) राजेश टोपे (घनसावंगी) 
६) अशोक पवार (शिरूर) 
७) प्राजक्त तनपुरे (राहुरी) 
८) रोहित पवार (कर्जत जामखेड) 
९) सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ) 
१०) सुनील भुसारा (विक्रमगड) 
११) संदीप क्षीरसागर (बीड) 
१२) मानसिंग नाईक (शिराळा)

Milind Narvekar : नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेगा प्लॅन, शिंदेंचे आमदार फोडणार?

Parishad Election Result Live : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना तिकीट देण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण 15 मते आहेत. त्यामुळे नार्वेकरांच्या विजायासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी काही मते लागतील. त्यामुळे काँग्रेस पक्षाची काही मते तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदार गळाला लावून नार्वेकर यांना विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न असतील.

Vidhan Parishad Election Voting : उमेदवार विजयाचं नेमकं गणित काय? समजून घ्या..

Vidhan Parishad Election and Result : सध्या विधानसभेचे संख्याबळ 274 आहे. त्यामुळे उमेदवारांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांची गरज असेल. काँग्रेस पक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे विजयासाठी पुरेशी मतं नाहीत. प्रत्येक पक्षाला आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी इतर पक्षातील तसेच अपक्ष आमदारांशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी फाटाफुटीची शक्यता आहे. 

Vidhan Parishad election Updates : मिलिंद नार्वेकर, पंकजा मुंडेंसह अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात

Vidhan Parishad election Candidates : विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात यावेळी अनेक दिग्गज आहेत. यामध्ये मिलिंद देवरा, पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर (भाजप), प्रज्ञा सातव (काँग्रेस), भावना गवळी व कृपाल तुमाने (शिवसेना शिंदे गट), राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी अजित पवार गट), मिलिंद नार्वेकर (शिवसेना ठाकरे गट), जयंत पाटील (शेकाप) यांचा समावेश आहे.

Vidhan Parishad election Updates : मिलिंद नार्वेकर, पंकजा मुंडेंसह अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात

Vidhan Parishad election Candidates : विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात यावेळी अनेक दिग्गज आहेत. यामध्ये मिलिंद देवरा, पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर (भाजप), प्रज्ञा सातव (काँग्रेस), भावना गवळी व कृपाल तुमाने (शिवसेना शिंदे गट), राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी अजित पवार गट), मिलिंद नार्वेकर (शिवसेना ठाकरे गट), जयंत पाटील (शेकाप) यांचा समावेश आहे.

आज मतदान, आजच निकाल

Vidhan Parishad election Updates : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. या निवडणुकीचा आजच निकाल लागेल. त्यामुळे पराभूत होणारा उमेदवार नेमका कोण असेल, हे आजच स्पष्ट होईल. 

पार्श्वभूमी

Maharashtra Vidhan Parishad Election Live Updates : आजच्या विधानपरिषद निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एकूण 11 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या आहेत. अकराव्या जागेवर मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. तर, शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत.


निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांचा पक्ष 


 


भाजपाचे विजयी उमेदवार



  • पंकजा मुंडे (Pankaja Munde)

  • परिणय फुके (Parinay Fuke)

  • अमित गोरखे  (Amit Gorkhe)

  • योगेश टिळेकर (Yogesh Tilekar)

  • सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)


शिवसेनेचे विजयी उमेदवार (एकनाथ शिंदे)



  • भावना गवळी (Bhavana Gavali)

  • कृपाल तुमाने (Krupal Tumane)


राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार (अजित पवार)



  • राजेश विटेकर (Rajesh Vitekar)

  • शिवाजीराव गर्जे  (Shivajirao Garje)


काँग्रेसच्या विजयी उमेदवार



  • डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav)


शेतकरी कामगार पक्ष (शरद पवार समर्थन)



  • जयंत पाटील (Jayant Patil)  : पराभव


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)



  • मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) : विजयी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.