![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोठी बातमी : अजित पवारांचे दोन्ही उमेदवार जिंकले, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी
Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेत भाजपचे योगेश टिळेकर पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे उमेदवार विजयी झाले आहेत.
![मोठी बातमी : अजित पवारांचे दोन्ही उमेदवार जिंकले, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी MLC Election result 2024 Ajit Pawar party NCP candidate Shivajirao Garje and Rajesh Vitekar wins Maharashtra Vidhan Parishad election result nivdnuk nikal maharashtra politics Marathi news मोठी बातमी : अजित पवारांचे दोन्ही उमेदवार जिंकले, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/552b1ec8986a649a675e13c63b914bff172079092346994_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदारांचं संख्याबळ होतं. विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महायुतीची मतं मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधानपरिषदेत आमदार म्हणून बसतील.
महायुतीचे भाजपचे योगेश टिळेकर यांनी 26 मतांसह पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके हे विजयी झाले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनीही विजय मिळवला.
दुसरीकडे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी 26 मतं घेत विजय मिळवला. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र त्यांना विजय मिळवण्यासाठी एक मताची वाट पाहावी लागत आहे.
तिकडे भाजपचे सदाभाऊ खोत आणि महाविकास आघाडीकडून लढणारे शेकापचे जयंत पाटील हे डेंजर झोनमध्ये पाहायला मिळाले. मात्र सदाभाऊ खोत यांनी विजय मिळवला.
आतापर्यंत कोणकोणत्या उमेदवारांचा विजय?
भाजपचे विजयी उमदेवार
योगेश टिळेकर - 26 मते
पंकजा मुंडे - 26 मते
परिणय फुके- 26 मते
अमित गोरखे - 26 मते
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
भावना गवळी
कृपाल तुमाने
काँग्रेस विजयी उमेदवार
प्रज्ञा सातव - 26
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
भाजप- 103
काँग्रेस- 37
शिवसेना (ठाकरे)- 15
शिवसेना (शिंदे)- ३८
राष्ट्रवादी (अजित पवार)- 40
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- 12
छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत?
बहुजन विकास आघाडी- 3
समाजवादी पक्ष- 2
एमआयएम-2
प्रहार जनशक्ती पक्ष-2
मनसे-1
पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)-1
शेतकरी पक्ष- 1
जनसुराज्य शक्ती- 1
अपक्ष- 13
विविध पक्षांकडून विधान परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे
भाजपचे 5 विधानपरिषद उमेदवार
1. पंकजा मुंडे
2. परिणय फुके
3. सदाभाऊ खोत
4. अमित गोरखे
5. योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
शिवसेना (शिंदे)
1.कृपाल तुमाने
2. भावना गवळी
शिवसेना - ठाकरे
1. मिलिंद नार्वेकर
शेकाप - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार समर्थक उमेदवार
1.जयंत पाटील
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)