Maharashtra Politics : राहुल गांधी कुठे तमाशा करतो, मी सांगू का; भाजप आणि काँग्रेस आमदारांची विधानसभेत खडाजंगी
Maharashtra Assembly Session 2024 : मंगळवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आणि काँग्रेस आमदारांची विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली.
Maharashtra Assembly Session : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. मुंबईतील प्रश्नांवर बोलताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, मुंबई महापालिका (BMC) स्वायत्तता आहे का की, दोन पालकमंत्री ऑफिस टाकून बसले आहेत. मुंबईत सध्या श्वसनाचे आजार झाले आहेत. ही परिस्थिती कोणामुळे आली आहे. आशिष शेलार यांनी राजकीय भाषण केलं. मुख्यमंत्री म्हणाले होते, सर्व रस्ते सिमेंट काँक्रेटचे होतील.
काँग्रेस आणि भाजप आमदारांत जोरदार खडाजंगी
सात हजार कोटींचं काम पण, काम काहीच झालं नाही. मान्सून सुरु झाला तर रस्त्याची अवस्था काय होणार, रस्त्याचं टेंडर कोणाला मिळालं सर्वाना माहित आहे. आपल्या मित्राला टेंडर कस मिळेल ही सरकारची भूमिका असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला आहे. वर्षा गायकवाड यांच्या भाषणावर भाजप आमदारांनी आक्षेप घेतला. वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या प्रश्नांवर बोलावं त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करू नये, असं म्हणत भाजप आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
वर्षा गायकवाड यांच्या भाषणावर भाजप आमदारांचा आक्षेप
वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजप आमदारांची हरकत घेतली. भाजप आमदार अमित साटम यांनी म्हटलं की, मुंबईच्या प्रश्नावर इथे चर्चा सुरु आहे. पंतप्रधानांचा काय संबंध, राहुल गांधी कुठे तमाशा करतो, हे मी सांगू का, असं म्हणत अमित साटम यांनी वर्षा गायकवाडांवर निशाणा साधला. यानंतर काँग्रेस आणि भाजप आमदारांत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
पुरावे नसतील तर आरोप करणं अयोग्य
अशिष शेलार यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. यानंतर अशिष शेलार यांनी म्हटलं की, जर पुरावे नसतील तर असे आरोप करणं योग्य नाही. तुम्ही समज दया, असं म्हणत शेलारांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.
'मित्रांना मदत न करता, मुंबईचा विकास करा'
दरम्यान, भाजपच्या (BJP) आरोपांनंतर वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, 'माझं भाषण चांगलं झालं हे, मला यांच्या प्रतीकेरियेवरुन समजत आहे. मुंबई ही मुंबई राहीली पाहिजे. मित्रांना मदत केली नाही पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्याभूमीच काम झालं पाहिजे. मित्र परिवारांना सांभाळणं हे थांबलं पाहिजे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
Varsha Gaikwad Video : पाहा व्हिडीओ : यांचा मोदींवर निशाणा, अमित साटम भडकले...