एक्स्प्लोर

Chandrakant Khaire : स्वतःची टिमकी वाजवणारं सरकार, शिंदे गटाच्या जाहिरातीवरून चंद्रकांत खैरेंची खोचक टीका

Chandrakant Khaire : फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष, हुशार व्यक्तीची लोकप्रियता कमी झाली आणि कमी शिकलेले शिंदे यांची प्रतिमा कशी वाढली, चंद्रकांत खैरे यांचा सवाल.

Chandrakant Khaire On Shinde Group : शिवसेनेकडून (शिंदे गट) आज राज्यातील महत्वाच्या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या जाहिरातीमुळे चर्चेला उधाण आले आहे. कारण या जाहिरातमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे यावरून वेगवेगळ्या प्रतिकिया येत असून, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील यावर प्रतिकिया देतांना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर स्वतःची टिमकी वाजवणारं हे सरकार असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. 

लाखो-करोडे रुपयांच्या जाहिरात देऊन स्वतःची टिमकी वाजवणारे हे सरकार आहे. मी देखील मोठ्या प्रमाणावर स्वतःची जाहिरात करेन, पण याचा अर्थ असा नाही होत की माझी खूप लोकप्रियता वाढली आहे. जनतेचा जो सर्व्हे झाला होता, भाजपने देखील असा जनतेचा सर्व्हे केला होता. त्यात हे लोकं पूर्णपणे अपयशी ठरत आहे. खोटेनाटे नाटकं करून स्वतःची प्रतिमा वाढवण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. हे सर्व चुकीचे आहे. फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष, हुशार व्यक्तीची लोकप्रियता कमी झाली आणि कमी शिकलेले शिंदे यांची प्रतिमा कशी वाढली. त्यामुळे हा सर्व्हे चुकीचा आहे. तसेच भाजपची प्रतिमा खराब करणारा हा सर्व्हे आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस कुठे गायब झाले होते माहित नाही. मात्र तीन दिवसांनी आता परत प्रकट झाले. प्रकट झाल्यावर अशी जाहिरात दिली असून, हे चुकीचे आहे. 

पुढे बोलताना खैरे म्हणाले की, आमच्या शिवसेनेची (ठाकरे गट) मान्यता आजही प्रचंड आहे. अनेकजण सांगतात शिवसेनेची प्रतिमा वाढली आहे. याबाबत एक मोठा नेता बोलला, मी नाव सांगत नाही. यांना आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतो. अनेकजण सर्व्हे करणाऱ्यांना मॅनेज करतात, टिमकी वाजवण्यात काय अर्थ आहे. भाजपच्या जुन्या मित्रांना दाखवावं लागेल शिंदे सोबत गेल्याने तुम्ही डाऊन झालात म्हणून. उद्धव साहेबासोबत असताना तुम्ही मुख्यमंत्री होता. आताची परिस्थिती तुम्हाला आवडेल का..? तुमचे चेहरे पडले आम्ही टिव्हीत बघतो, फडणवीस यांचा चेहरा पडला असल्याचे खैरे म्हणाले. 

शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद...

तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच  मतभेद चाव्हाट्यावर यायला लागेल आहेत. शिवसेना प्रमुखांच्या नाव घेतात, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणतात. मग बाळासाहेबांचा फोटो जाहिरातीत टाकला पाहिजे होता. हे सर्व भाजपकडे तर चालले आहेत असं दिसतंय. शिस्तबद्ध भाजपला भ्रष्टाचार आणि वाचाळवीरपणा कसं आवडत आहे. भाजपला प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल तर या लोकांना काढावा लागेल. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर बोट ठेवायचा अधिकार कुणालाच नाही. सर्वसामान्य नागरिक आजही उद्धव ठाकरेंची स्तुती करतात. हा सर्व्हे (शिंदेगट) यांनी केलेला आहे. यांच्याकडे चेले चपाटे आहेत ते सर्व्हे करतात. शिंदे गट आणि भाजपमध्ये फाटतंय म्हणून मला आनंद आहे.

काय जाहिरात प्रकरण? 

आधीच शिंदे गटात आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. अशातच शिंदे गटाकडून आज राज्यातील महत्वाच्या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या जाहिरातीमुळे नवीन चर्चा सुरु झाली आहे. कारण या जाहिरातमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Ajit Pawar : काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Embed widget