एक्स्प्लोर

Meghna Bordikar: आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर; ब्रिटिश संसदेत होणार गौरव

Parbhani News : चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे.

Parbhani News : लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'भारत गौरव पुरस्कार' यंदा भाजपच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर (Meghna Bordikar) यांना जाहीर झाला आहे. ब्रिटनच्या संसदेत एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार मेघना बोर्डीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे.

विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना 'भारत गौरव पुरस्कार' देण्यात येतो. दरम्यान मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे सामाजिक कार्य, विकासाप्रती बांधिलकी, कर्तव्यपूर्तीची भावना, पर्यावरणासाठी त्यांनी केलेले कार्य यामुळे देशाच्या सामाजिक आणि भौतिक विकासात त्यांनी भर घातल्याचे कळवत आयोजकांनी त्यांना ब्रिटिश संसदेत होणाऱ्या या पुरस्काराच्या वितरणासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण दिले आहे. 

या पुरस्कार सोहळ्यात वेदांता ग्रुपचे सीएमडी डॉ. नरेश त्रेहान, जेट एअरवेजचे अंकित जालान, जिनिव्हा येथील शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंड येथील अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, युके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील तब्बल वीस देशातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरण करण्यात येणार आहे.

ब्रिटिश संसदेत झळकावण्याचा मान परभणी जिल्ह्याला 

मागील दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. या आधी 'भारत गौरव पुरस्कार' आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, चित्रपट कलाकार मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जगातील सर्वात प्रभावशाली महिला श्रीमती इंदिरा नूयी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गुगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जीमेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, प्रेरक वक्ते गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे. मात्र यंदाच्या पुरस्कारकर्त्यांच्या यादीत मेघना बोर्डिकर यांचे नाव असल्याने जिल्हाभरात कौतुक होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे नाव ब्रिटिश संसदेत झळकावण्याचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे, असेच म्हणावे लागेल.

कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा...

लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'भारत गौरव पुरस्कार' यंदा भाजपच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांना जाहीर झाल्याचं कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. आत्तापर्यंत देशातील काही मोजक्याच लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान यात आता आमदार बोर्डीकर यांची भर पडली आहे. त्यामुळे बोर्डीकर यांच्या कुटुंबासह त्यांच्या कार्यकर्ते आणि मित्रमंडळी यांच्यामध्ये आनंद पाहायला मिळतोय. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sai Resort Case : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाच्या आरोपपत्रात अनिल परब यांचं नावच नाही, ईडीकडून दिलासा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Embed widget