एक्स्प्लोर

Sai Resort Case : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाच्या आरोपपत्रात अनिल परब यांचं नावच नाही, ईडीकडून दिलासा?

Anil Parab Dapoli Sai Resort : अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र सादर केले आणि यातील महत्त्वाची बाब म्हणजे या आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेख नाही.

Anil Parab Dapoli Sai Resort : आरोपांवर आरोप केले जातात मात्र आरोपपत्रामध्ये नावच नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात (Dapoli Sai Resort Case) नुकतेच आरोपपत्र सादर केले आणि यातील महत्त्वाची बाब म्हणजे या आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा उल्लेख नाही. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला होता. पण ज्याप्रमाणे आरोप केले जात होते, त्याप्रमाणे आता तपासात परब यांचा सहभाग आढळला नाही किंवा त्यांच्याविरोधात काही पुरावे सापडले नाहीत का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 

अनिल परब हे एकटेच असे नेते नाहीत ज्यांच्यावर आरोप करण्यात आले. यापूर्वी अजित पवार यांच्यावर सुद्धा असे आरोप केले होते. पण मात्र आरोपपत्रामध्ये त्यांचंही नाव नव्हतं. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही यापूर्वी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांच्या बँक खात्यात फक्त एक कोटी सापडले आणि वसुलीचे आरोप खोटे ठरले. मात्र या केलेल्या आरोपांमुळे एखाद्याची बदनामी तर होतेच पण त्याचं नुकसान सुद्धा होतं. यासंदर्भात अनिल परब यांनी कोर्टात दावा करत हे आरोप खोटे असून आपल्या बदनामीसाठी केल्याचा उल्लेख केला होता.

ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करु शकते

अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. यात उद्योजक सदानंद कदम, दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे आणि इतर चार जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र आरोपपत्रात माजी मंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांचा उल्लेख नाही. अनिल पबर यांनी बेकायदेशीररित्या साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप ईडीने केला होता. परंतु आरोपपत्रात मात्र अनिल परब यांचा उल्लेख केलेला नाही. दरम्यान आमचा तपास सुरु असून या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करु शकतो, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

तपास अजूनही सुरु : ईडी

यावर्षी मार्च महिन्यात न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान ईडीने सदानंद कदम यांची कोठडी मागितली होती. साई रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालं आणि हे रिसॉर्ट अनिल परब यांनी सदानं कदम यांना विकले होते, असा दावा त्यावेळी ईडीने केला होता. तर या प्रकरणात ईडीने अनेक वेळा अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु आपला त्या जमिनीशी किंवा रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही, असा दावा अनिल परब यांनी सातत्याने केला होता.

दरम्यान आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेख नसण्याबाबत ईडी अधिकाऱ्यांना विचारलं असता, तपास अजूनही सुरुच असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

अनिल परब

अनिल परब यांच्याबाबत तपासयंत्रणेची सावध भूमिका

याप्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. 

देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे 

या प्रकरणात तपास अद्यापही सुरु असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे

अजित पवार

तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही एका प्रकरणातील आरोपपत्रात नाव नाही.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या कथित लिलावाशी संबंधित ईडीने आरोपपत्र दाखल केले आणि त्या गुरु कमोडिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि योगेश बागरेचा सीए यांचे नाव होते.

हा कारखाना त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असला तरी त्यात अजित पवार यांचे नाव नाही.

या प्रकरणातही तपास सुरु असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

अनिल देशमुख

- त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप देखील सिद्ध झाले नाहीत

- अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आले 

- या प्रकरणाचा तपास करत तपास यंत्रणांनी त्यांना अटक सुद्धा केली 

- मात्र ते शंभर कोटीचे त्यांच्यावर आरोप केले होते ते सिद्ध झाले नाहीत 

- कारण त्यांच्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये फक्त सव्वा कोटी रुपये सापडले होते मग केलेल्या आरोपांप्रमाणे 100 कोटी रुपये अखेर गेले कुठे असा प्रश्न आहे 

आता जरी अनिल परब किंवा अजित पवार यांचा नावाचा उल्लेख आरोपपत्रात नसला तरी ईडीला पुढे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची मुभा आहे. त्यामुळे ईडी पुरवणी आरोपपत्रात अनिल परब आणि अजित पवार यांचा नावाचा उल्लेख करतील का किंवा त्यांना क्लीन चिट दिली जाईल हे पाहावं लागेल.

VIDEO : Sai Resort Case Chargesheet : साई रिसॉर्टच्या आरोपपत्रात अनिल परब यांचं नावच नाही, ईडीकडून दिलासा?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, राणाजगजितसिंह पाटलांना कार्यक्रमातून डावलले; ओमराजे निंबाळकरांची प्रमुख उपस्थिती, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, राणाजगजितसिंह पाटलांना कार्यक्रमातून डावलले; ओमराजे निंबाळकरांची प्रमुख उपस्थिती, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget