मराठा आरक्षणासाठी सरकार प्रो अॅक्टिव्ह, मनोज जरांगेंनी एक टीम करावी म्हणजे विषय संपेल :चंद्रकांत पाटील
लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. काही कारणाने उमेदवारी घोषित करण्यास जो उशीर झाला ते लक्षात घेऊन यावेळी नक्कीच दुरुस्ती होईल.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) सरकार प्रो अॅक्टिव्ह आहे. आपणही दहा जणांची टीम तयार करा आंदोलनामध्ये दहा पैकी पावणेदहा गोष्टी झाल्या की मी उठतो असं होत नाही. तर आंदोलनामध्ये दहा पैकी आठ मागण्या पूर्ण झाल्या तर उठायला हवे. मनोज जरांगेनी (Manoj Jarange) अभ्यासू टीम तयार केली तर हा विषय संपेल, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आता त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. त्यांचा बिपी खालवत चालला असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना उपचाराचा सल्ला दिला आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या विषयी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मराठा आरक्षणाविषयी सरकार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधणे त्यांना काही फॅक्ट्स समजावून सांगणं हे करणारच आहे. मराठा आरक्षणाविषयी सरकार प्रो अॅक्टिव्ह आहे.
फडणवीसांच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून मुक्त करण्याच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमध्ये नेत्याची इच्छा ही तर आज्ञा असते नेत्याने आज्ञा करायची नाही. त्यांनी इच्छा व्यक्त करायची असते असं असल्यामुळे आम्ही टिकलो. अमित शाह यांनी फडणवीस यांना थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेतलेला आहे आणि ते पुन्हा कामाला लागलेले आहेत.
लोकसभा निकालावर चंद्रकांत पाटील म्हणाले...
लोकसभा निकालावर मनोज जरांगे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. काही कारणाने उमेदवारी घोषित करण्यास जो उशीर झाला ते लक्षात घेऊन यावेळी नक्कीच दुरुस्ती होईल.
राजकारणात अनेक कारणांनी काही ना काही बदल करावे लगातात : चंद्रकांत पाटील
अजित पवारांना केंद्रात एकही मंत्रीपद मिळाले नाही यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रफुल पटेल यांना मंत्रिपद द्यायचं ठरलेलं होतं पण आता जी पॉलिसी ठरली त्यात त्यांना राज्यमंत्रीपद जात होते, मात्र प्रफुल पटेल एक कॅबिनेट मंत्री असल्यामुळे ते म्हणाले हे मला सोयीचं होणार नाही. आपण राज्यमंत्रीपदी घेण्यापेक्षा आपण थोडं थांबू असा त्यांचा निर्णय झालेला आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात अनेक कारणांनी काही ना काही बदल करावे लागतात.
हे ही वाचा:
Manoj Jarange Patil : बिपी खालावला, तब्येत ढासळली, डॉक्टरांचा उपचाराचा सल्ला, मात्र मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार