एक्स्प्लोर

Abdul Sattar On Chandrakant Khaire : सत्तार म्हणतात खैरेंना अटक झालीच पाहिजे; तर अशा गुन्ह्याला मी घाबरत नाही खैरेंचं प्रत्युत्तर

Abdul Sattar On Chandrakant Khaire : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. खैरे यांच्यावर रितसर कारवाई करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

Abdul Sattar On Chandrakant Khaire : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादच्या (Aurangabad) सातारा पोलीस ठाण्यात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान खैरे यांच्यावर रितसर कारवाई करुन त्यांना अटक सुद्धा करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. तर अशा गुन्ह्याला मी घाबरत नाही असं प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना चंद्रकांत खैरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खैरे यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. याबाबतच बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, "प्रत्येक व्यक्तीने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा आदर राखला पाहिजे. शासकीय नियमानुसार खैरे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई योग्यच आहे. तसेच कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत." "त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर नियमाप्रमाणे खैरे यांना अटक सुद्धा झाली पाहिजे," असेही सत्तार म्हणाले.

खैरेंचं प्रत्युत्तर...
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून पाप केलं आहे. हा संताप फक्त महाराष्ट्रातील नव्हेतर देशभरातील शिवसैनिकांमध्ये आहे. शिवसैनिक चिडलेले असून, या चिडीमध्ये मी काही बोललो असेल तर काय बोललो? आपण आंदोलनात सुद्धा सहज म्हणतो 'याच करायचं काय, खाली मुंडकं वरती पाय'...त्याप्रमाणे मी म्हणालो होतो. मला अटकेची भीती वाटत नाही. मी घाबरत नाही काय होईल ते पाहूत, हिंदुत्वासाठी जेलमध्ये जाणारा मराठवाड्यातील मी पहिला शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या आनंद दिघेंच्या चित्रपटात खुद गद्दारांना शिक्षा दिल्याचं दाखवलं आहे. त्याप्रमाणे मी म्हणालो होतो," असं खैरे म्हणाले.

Abdul Sattar On Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांना अटक झालीच पाहिजे : सत्तार

 

खैरे यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनेकदा बोके, चोर, रिक्षावाला असे शब्द वापरुन अपमानित करुन त्यांचे चारित्र्यहनन आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला खैरे यांच्याकडून केला जात असल्याची तक्रार शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पोलिसात दिली होती. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांची सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवण्याच्या दृष्टीने सोशल मीडियाच्या विविध माध्यमावर असंवैधानिक भाषेचा वापर करणे, तसेच दंगल घडवण्याच्या दृष्टीने दोन गटात भांडणे लावणे, दंगल घडवण्याचे उद्देशाने नेहमी वक्तव्य करणे आणि त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यांमुळे भावना दुखावल्याचा उल्लेख सुद्धा या तक्रारीत करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सBengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागणसकाळी १० च्या100 हेडलाईन्स- Top Headlines at 10AM 06 January 2025  Top 100 at 10AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
Beed News: मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
HMPV Virus in India : चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Embed widget