Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलचं तापतंय. उद्धव ठाकरेंनी भाजपवर मुंबई गिळायची असल्याचा घणाघात केला त्यानंतर संजय राऊतांनीही मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्याला आता विधानसभेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा चांगलाच राजकीय सामना रंगणार हे मात्र स्पष्ट झालंय. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
मतदार जनजागृतीसाठी रील तयार
मतदार जनजागृतीसाठी रील तयार करण्यात आले आहेत
जेष्ठ नागरिक आणि दुव्यांगनासाठी सुविधा असतील
रैंप आणि व्हीलचेयर मतदान केंद्रावर असतील
पिंक मतदान केंद्रावर सगळे
२९० अधिकाऱ्यांची नेमणूक सगळ्यात ८७० अधिकाऱ्यांची नेमणूक
१९६६०५ कर्मचारी
४८ तास आधी प्रचारावर निर्बंध
त्यावेळी जाहिरातींवर बंदी असेल
दिल्लीतील धुक्याचा फटका मेसीच्या दौऱ्याला; लहानसहान कार्यक्रम रद्द करून मेस्सी थेट स्टेडियमच्या दिशेने
लिओनेल मेसीच्या दिल्ली दौऱ्याला हिवाळ्यातील धुक्याने धोका दिला आहे. सकाळी १० च्या सुमारास दिल्लीत पोहचण्याचे अपेक्षित असलेला मेस्सी उशिराने राजधानीत दाखल झाला. त्यामुळे मेस्सीचा नियोजित दौरा बदलण्यात आला असून प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानावरील नियोजित कार्यक्रमही रद्द झाला आहे.























