Maharashtra Karnataka Border Dispute : शरद पवारांचा गनिमी कावा, ड्रायव्हर बनून बेळगावात घुसले होते, सुप्रिया सुळेंनी सांगितला रंजक किस्सा
Maharashtra Karnataka Border Dispute : ड्रायव्हर बनून बेळगावात घुसले, पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण मागे हटले नाहीत; असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा ऐंशीच्या दशकातील रंजक किस्सा सांगितला.
Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) यांच्यातील सीमा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कर्नाटकच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी 6 डिसेंबरचा बेळगाव दौरा रद्द केल्यावरुन विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) फेसबुक पोस्ट फारच चर्चेत आली. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि एसएम जोशी यांच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादा प्रकरण (Maharashtra-Karnataka Border Dispute) एका जुन्या आंदोलनाचा उल्लेख केला. "कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पोस्टनुसार, ऐंशीच्या दशकात शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या दरम्यान एक आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्याही झेलल्या होत्या परंतु ते मागे हटले नाहीत. खुद्द एसएम जोशी हे देखील शरद पवार यांच्या पाठीवरील लाठीचे व्रण पाहून हळहळले होते.
Maharashtra-Karnataka Border Dispute : फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलं?
सुप्रिया सुळेंनी लिहिलं आहे की, तो काळ वेगळा होता. सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केलं होतं. त्याविरोधात आंदोलनांची घोषणा करण्यात आली होती. खुद्द एस एम जोशी यांनी 1986 मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जाऊन भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरवलं होतं. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक सरकारने सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवला. सोबतच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.
Maharashtra-Karnataka Border Dispute : 10 दिवसात दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन, 81 वर्षाचा योद्धा मैदानात, सीमावादावर आक्रमक भूमिका
Maharashtra Karnataka Border Dispute : जेव्हा ड्रायव्हर बनून शरद पवार कर्नाटक सीमेत घुसले होते...
आंदोलनाच्या पहिल्या दिवसाचं नेतृत्त्व शरद पवार यांच्याकडे होतं. परंतु कर्नाटक सीमेत प्रवेश करणं अशक्य वाटत होतं. अशात शरद पवार यांनी शक्कल लढवली. पहिल्यांदा ते कोल्हापूरला गेले तिथून एक फियाट कार घेतली. यावेळी शरद पवारांनी आपल्यासोबत बाबासाहेब कुपेकर आणि एका चालकाला घएतलं. त्यांना कोणीही ओळखू नये म्हणून ते स्वत: चालक असल्याची बतावणी केली. तर चालकाला मालकाच्या जागी बसवलं. अशाप्रकारे तिघे बेळगावच्या दिशेने रवाना झाले. चेकपोस्टवर त्यांची चौकशीही झाली पण गाडी चालवणारी व्यक्ती ही शरद पवार आहेत, याचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. अशाप्रकारे शरद पवार बेळगावात पोहोचले.
Maharashtra Karnataka Border Dispute : पवारांच्या पाठीवरील लाठ्यांचे वळ पाहून एसएम जोशीही हळहळले
त्यावेळी बेळगावात संचारबंदी लागू होती पण शरद पवार फार लवकर पोहोचले होते. त्यामुळे ते अरविंद गोगंटे यांच्या घरी थांबले होते. आंदोलनाची वेळ झाली तेव्हा ठीक अकरा वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. हजारो लोकांच्या अचानक जमलेल्या गर्दीमुळे पोलीस गोंधळले. यानंतर संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. पोलिसांनी शरद पवार, बाबासाहेब कुपेकर आदींवर लाठीमार केला. त्यानंतर त्यांना हिडकल धरण संकुलातील विश्रामगृहात नेण्यात आलं. एसएम जोशी जेव्हा शरद पवारांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांना पवारांच्या पाठीवर लाठ्यांचे वळ दिसल्या तेव्हा ते हळहळले होते. तो भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे. सगळंच बदललं आहे.
सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट