(Source: ECI/ABP News/ABP Majha)
10 दिवसात दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन, 81 वर्षाचा योद्धा मैदानात, सीमावादावर आक्रमक भूमिका
Sharad Pawar PC on Border Dispute: 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील (Maharashtra Karnatak Border) सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले.
मुंबई : बेळगाव सीमाभागात (Belgaum Border) कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike) संघटनेने मांडलेल्या उच्छादानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील (Maharashtra Karnatak Border) सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar PC) घेऊन आज सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली.
"माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. पुढच्या 10 दिवसांत दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन होणारं आहे. आज भूमिका घेण्याची वेळ आली आहे त्यामुळं पत्रकार परिषद घेतली आहे", असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
Sharad Pawar PC on Border Dispute : महापरिनिर्वाण दिनी कर्नाटककडून असंवैधानिक घडामोडी
संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, ज्यांनी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाणा दिवशी आज काही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. या सगळ्या बाबीतून स्पष्ट होतं आहे की सीमाभागात किती गंभीर परिस्थिती आहे. सीमाभागात ज्या काही घटना घडतात त्यावेळी त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते माझ्या सातत्यानं संपर्कात असतात. आज जी माहिती आली आहे माझ्याकडे ती गंभीर आहे. तिथं गाड्या तपासणे, कार्यकर्त्यांची चौकशी करणे सुरू आहे. मराठी भाषिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतं आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
Sharad Pawar PC on Border Dispute : शिंदे-फडणवीस सरकारने भूमिका घेणं गरजेचं
या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होत मात्र ती घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिला.
देशाच्या ऐक्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरू होतं आहे. मी खासदारांना विनंती करणार आहे की त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घ्यावी. तरी देखील भूमिका घेतली गेली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.
माझ्यासह सर्वांना बेळगाववासियांना दिलासा देण्यासाठी बेळगावला जावं लागेल. संयम ठेवूनदेखील जर हालचाल होतं नसेल तर आम्हाला बेळगाववासियांना दिलासा द्यावा लागेल यासाठी भूमिका घ्यावी लागेल, असं शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar PC on Border Dispute : मी लहान लोकांवर बोलणार नाही
यावेळी शरद पवारांना उत्पनादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत विचारण्यात आलं. शंभूराज देसाई म्हणाले होते, यामागे कर्नाटक सरकार आहे की नाही ते बघावं लागेल, थेट आरोप करुन चालणार नाही. त्यावर पवार म्हणाले, "मी लहान लोकांवर बोलणार नाही".
सर्व खासदारांनी एकत्र भूमिका मांडावी
मी पुढील दोन तीन दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन भूमिका मांडवी अशी विनंती करत आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पावले टाकायची असतात, असं शरद पवारांनी नमूद केलं.
VIDEO : शरद पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद (Sharad Pawar PC Today on Maharashtra Karnataka Border dispute )
संबंधित बातम्या