एक्स्प्लोर

Santosh Bangar: 'पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक', विमा कंपनी विरोधात आमदार बांगर आक्रमक

Hingoli: हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या (Insurance Company) कार्यलयात तोडफोड करण्यात आली आहे. पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केला आहे.

Hingoli: हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या (Insurance Company) कार्यलयात तोडफोड करण्यात आली आहे. पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केला आहे. बोगस पंचनामे आणि बनावट सह्यांच्या आधारे पीकविमा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे. कार्यालयात कोणीही नसताना ही तोडफोड करण्यात आली आहे.     

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक पीडित शेजाऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारी पिकविमा कंपन्याकडे दिल्या.  परंतु पिकविमा कंपनीच्या वतीने परस्पर पंचनामा केले जात आहेत. तर बोगस पंचनामे तयार करून बनावट सह्या करत अहवाल दाखल केला जात आहे. या अहवालांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा अत्यल्प स्वरूपात दाखवले जात आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालेले असताना पिकविमा कंपन्या बनावटपणा करत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. 

हा प्रकार उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आमदार बांगर यांच्याकडे व्यथा मांडल्या आणि बांगर यांनी पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले. परंतु त्यांनी येण्यास टाळाटाळ केली. अखेर आमदार बांगर यांनी थेट पीकविमा कंपनीचा कार्यालय गाठलं त्या ठिकाणी अधिकारी नसल्याने आमदार बांगर चांगलेच आक्रमक झाले. यावेळी आक्रमक झालेल्या आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. अनेक शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसोबत आमदार बांगर यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. यात आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्ते पीकविमा कंपनीच्या कार्यलयात वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे. तसेच अनेक कार्यकर्ते या कार्यालयातील खुर्च्या फेकताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओत संतोष बांगर हे देखील या कार्यलयातील फोन भिंतीवर आपटताना दिसत आहे.      

दरम्यान, अद्याप या सर्व प्रकरणाबाबद पीकविमा कंपनीच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यासंबंधित अद्याप तक्रार नोंदवल्याची कुठली माहिती देखील अद्याप मिळू शकलेली नाही. या घडलेल्या प्रकाराबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर म्हणाले आहेत की, संतोष बांगर यांनी जर तोडफोड केली असेल तर त्याचं मी समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री या संदर्भात चौकशी करतील.
     
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget