एक्स्प्लोर

शपथविधीनंतर शासकीय बंगल्याचीही अदलाबदल; देवेंद्र फडणवीसांच्या वर्षावरील नावाच्या पाटीवरून मुख्यमंत्री शब्द झाकला 

Maharashtra Politics: राज्यात मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला असताना इतर अनेक घडामोडींना आता वेग आला आहे. अशातच वर्षा निवासस्थानी लावलेल्या नावाच्या पाटीवरून "मुख्यमंत्री" शब्द झाकला गेला आहे. 

Maharashtra Politics मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तर अखेर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री  ठरले  असून त्यांनी केलेल्या 'मी पुन्हा येईन'ची प्रतिज्ञा खरी ठरली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, अनेक अडथळ्यांची मालिका आणि नाराजीनाट्य रंगल्या नंतर मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला असताना इतर अनेक घडामोडींना आता वेग आला आहे. अशातच वर्षा निवासस्थानी लावलेल्या नावाच्या पाटीवरून "मुख्यमंत्री" शब्द झाकला गेला आहे. 

नेमकं कारण काय? 

वर्षा निवासस्थानी लावण्यात आलेल्या एकनाथ संभाजी शिंदे यांचे नाव तसेच ठेवत त्याखालील "मुख्यमंत्री" या पदावर कागद चिकटवण्यात आला आहे. काल जरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असली तरीही अजून वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांचे वास्तव्य आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना नंदनवन या शासकिय निवासस्थानी राहणार आहेत. वर्षावरील काही सामान नंदनवन बंगल्यात नेण्यात आलेले आहे. मात्र, तिथे देखील काही काम सुरू असल्याने सध्या एकमेव शिंदे हे वर्षा निवासस्थानावर वास्तव्यास आहेत.

देवगिरी, रामगिरी या नागपुरातील बंगल्याचीही अदलाबदल

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला नसला, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे. नागपूरातील रामगिरी म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या आणि देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या  शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशदारावर हे सत्ता केंद्र बदलाचे दृश्य प्रकर्षाने जाणवत आहे. रामगिरी बंगल्याचे प्रवेशद्वारावर कालपर्यंत असलेली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची पाटी काढून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. तर देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या नावाऐवजी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल झाले नसले, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे आणि तेच नागपुरात रामगिरी आणि देवगिरी या दोन शासकीय बंगल्यांच्या प्रवेशद्वारावर दिसून येत आहे.

गृहखात्यावर फडणवीसांनी काय म्हटलं 

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी गृहखात्यावर स्पष्टपणे भाष्य केलं. गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मीतहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे, गृहखात्याचा सस्पेन्स कायम आहे. मात्र, दिल्लीतील केंद्रीय गृहखात्याचा व राज्यातील गृहखात्याचा समन्वय चांगला होण्यासाठी ते खातं आमच्याकडेच असेल तर चांगलं असेही फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget