लेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू
पिलीभीत जिल्ह्यातील न्यूरिया क्षेत्रातील टकनपूर महामार्गावर लग्नाहून परतणारी कार झाडावर आदळल्याची घटना घडली.
पिलीभीत - उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभीत येथे अपघाताच्या दोन भीषण घटना घडल्या असून या दोन्ही दुर्घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एका कारमधून वाहतूक करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये, 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. लग्न समारंभाहून परत येत असताना या कारचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत वधु हुसना हिचे वडिल मंजूर अहमद यांचाही जागीच मृत्यू झाला. लेकीचं लग्न लावून परत येत असताना ही ह्रदयद्रावक घटना घडली. कार हायस्पीडने जात असल्याने दुर्घटनेत कारचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. तर, चित्रकूट येथे बोलेरो व ट्रकमध्ये धडक होऊन 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे, 24 तासांतच दोन अपघाताच्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी (Police) धाव घेत पंचनामा केला.
पिलीभीत जिल्ह्यातील न्यूरिया क्षेत्रातील टकनपूर महामार्गावर लग्नाहून परतणारी कार झाडावर आदळल्याची घटना घडली. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले, मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र, तोपर्यंत कारमधील 5 जणांचा मृत्यू झाला होता. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कारमधून 11 जण प्रवास करत होते, त्यातील 6 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दुसऱ्या घटनेत चित्रकूट येथे भाविकांनी भरलेली बोलेरो कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. रैपुरा पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सर्वजण मध्य प्रदेशच्या छतरपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यातील दोघांना प्रयागराज येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडू शोक
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पिलीभीत येथील घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, जखमींना तत्काळ रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचनाही संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ