एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion: भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र, चंद्रशेखर बावनकुळे मंत्री होणार; भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाचं नाव आघाडीवर?

Maharashtra Cabinet Expansion Ravindra Chavan: भाजपकडून मंत्रि‍पदासाठी काही नवीन आमदारांना संधी देण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion Ravindra Chavan: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला. भाजपकडून मंत्रि‍पदासाठी काही नवीन आमदारांना संधी देण्यात आली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

रविंद्र चव्हाणांचे भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाव आघाडीवर-

शिंदे सरकारच्या काळात मंत्रि‍पदी राहिलेले रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना भाजपकडून नवीन जबाबदारी देण्याची शक्यता आहे. रविंद्र चव्हाणांचे भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाव आघाडीवर असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. ठाणे आणि कोकणमध्ये महाविकास आघाडीचा बालेकिल्ला उध्वस्त केल्यानंतर आता रविंद्र चव्हाण यांना महाराष्ट्राची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे. मात्र फडणवीस सरकारच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे देखील मंत्री होणार आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. रविंद्र चव्हाण यांनी शिंदे सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिलं होतं.

रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द-

- 2007 मध्ये भाजपचे नगरसेवक 

- 2007 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.

- 2009 मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून भाजपची उमेदवारी

- 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार 

- 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला, कर्जत, माथेरान, बदलापूर मध्ये भाजपचे यश त्यामुळे त्यांना राज्यमंत्री, रायगड, पालघर पालकमंत्री 

- 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार 

- 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात मोलाचा वाटा 

- 2021 मध्ये कॅबिनेट मंत्री पीडब्ल्यूडी खाते, पालकमंत्री सिंधूदुर्ग, पालघर नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर आणि सा बां मंत्री असताना अडीच वर्षात राज्यात आतापर्यंत सर्वाधिक निधी सर्वपक्षीय आमदारांना दिलेले मंत्री अशी ख्याती... 

- 2024 मध्ये चौथ्यादा डोंबिवलीतून आमदार झाले.

भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन- (BJP Cabinet Minister List)

1. नितेश राणे 
2. शिवेंद्रराजे भोसले 
3. चंद्रकांत पाटील 
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा 
6. गिरीश महाजन 
7. जयकुमार रावल 
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक 
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे 
13. जयकुमार गोरे 
14. माधुरी मिसाळ 
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके 
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार

संबंधित बातमी:

महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला फोन; संपूर्ण यादी एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं,  म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 AM 28 March 2025Pune Gauri Sambrekar Bangalore :  गौरी संबरेकरची पतीकडूनच बंगळूरमध्ये भीषण हत्याABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 28 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं,  म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
Ajit Pawar : फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
Pune Crime: साताऱ्याच्या गौरीचा बंगळुरुत सुटकेसमध्ये मृतदेह, महिनाभरापूर्वी मुंबईतून शिफ्ट झालेल्या पती राकेशने पत्नीला का संपवलं?
साताऱ्याची गौरी, पुण्याचा राकेश, बंगळुरुत वाद, पत्नीला संपवून सुटकेसमध्ये ठेवलं, मुंबई ते बंगळुरू हत्याकांडाचा थरार!
पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा नियोजन शून्य निर्णय, राज्य सरकारला कोट्यवधींचा फटका, नेमका किती झालाय आतापर्यंत खर्च?
पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा नियोजन शून्य निर्णय, राज्य सरकारला कोट्यवधींचा फटका, नेमका किती झालाय आतापर्यंत खर्च?
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Embed widget