Dattatray Bharane: अजितदादांचे विश्वासू दत्तात्रय भरणेंना मंत्रीपदाची संधी; तीन वेळा माजी मंत्र्यांना पराभवाची धुळ चारणाऱ्या आमदारांची मंत्रीपदी वर्णी
Maharashtra Cabinet expansion: आपलं काम व विकासाच्या जोरावर आज त्यांनी मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे.
पुणे: कोणताही राजकीय वारसा नसतानाही एका कार्यकर्त्यांपासून सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागली आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे शेतकरी कुंटूबातील आहेत. कुंटूबाला कसलाही राजकीय वारसा नाही. आपलं काम व विकासाच्या जोरावर आज त्यांनी मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची ओळख आहे. (Maharashtra Cabinet expansion)
आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी 1992 साली वयाच्या 22 व्या वर्षी भवानीनगर मधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली आहे. 1996 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2001 साली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला. यानंतर 2003 ते 2008 पर्यत भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष म्हणून धुरा संभाळली.
त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणमध्ये त्यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढवली. मात्र निवडणुकीमध्ये थोड्या मतांनी पराभव झाला. त्यानंतर 2012 साली अजित पवार यांनी भरणे यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यास सांगितली. त्यावेळी अजित पवारांनी भरणेंना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं. त्यानंतर विकासकामं आणि तळागाळापर्यंत असलेला जनसंपर्क यामुळे भरणे यांनी 2014, 2019 आणि आता पुन्हा 2024ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली. यावेळी त्यांना अजित पवारांनी मंत्रीपदी वर्णी लावली आहे.(Dattatray Bharane)
आमदार दत्तात्रय विठोबा भरणे यांची माहिती
जन्म- 15 एप्रिल 1969
प्राथमिक शिक्षण- भरणेवाडी
उच्च शिक्षण- बारामती व पुणे येथे पार पडले.
1992साली छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक पदापासून राजकीय सुरुवात
1998 साली पुणे जिल्हा बँकेवर संचालक पदी संधी
2000 साली पुणे जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी वर्णी.
2002 साली छत्रपती साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली.
2009 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना अवघ्या साडे तीन हजार मतांनी पराभव झाला होता.
2012 साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची संधी.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून इंदापूरचे आमदार पद पटकावले.
2019 साली पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला महाविकास आघाडी सरकारमध्ये भरणे राज्यमंत्री झाले.
2024 ला पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव भरणेंनी केला आणि विजयाची हॅट्रिक साधली, यावेळी अजित पवारांनी त्यांना मंत्रीपदाची संधी दिली.