एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha adhiveshan: नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड

Maharashtra MLAs oath taking ceremony: महायुती सरकार सत्तेत आले आहे. 288 आमदारांचा शपथविधी शनिवारी आणि रविवारी पार पडणार आहे. 78 नव्या चेहऱ्यांचा समावेश

मुंबई: राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा शपथविधी नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता आमदारांच्या शपथविधीसाठी (MLAs oath Taking Ceremony) शनिवारपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन (Vidhansabaha Adhiveshan) सुरु होणार आहे. शनिवारी आणि रविवारी 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल. नव्या आमदारांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात येईल. ते सर्व आमदारांना शपथ देतील.

दोन दिवसांत नव्या आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजप नेते राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची संख्या 78 इतकी आहे. या सर्व आमदारांच्या आगामी काळातील कामगिरीबद्दल राज्यातील जनतेला उत्सुकता आहे.

दरम्यान, एकीकडे आमदारांच्या शपथविधीची लगबग सुरु असताना दुसरीकडे महायुतीच्या गोटात मंत्रिमंडळातील खातेवाटबाबात खलबते सुरु आहेत. शनिवारी यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं आणि कोणती खाती येणार, याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.  

कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?

विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15 टक्के मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 43 जणांचा समावेश होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात केवळ 40 जणांची जागा शिल्लक आहे. या 40 खात्यांमध्ये तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना सामावून घेण्याची कसरत महायुतीला करावी लागणार आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 21 ते 22 मंत्रि‍पदे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे  एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाला नेमकी किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

आणखी वाचा

अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Embed widget