एक्स्प्लोर

जरांगेंच्या आरक्षणाला पाठिंबा देत मराठवाड्याचे माजी आयुक्त मधुकर आर्दड विधानसभा निवडणूकीच्या मैदानात

मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले.

Jalna: मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड (Madhukarraje Ardad) यांनी आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आज जाहीर केलंय. मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) कुणबीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा असल्याचं सांगत त्यांनी मतदारसंघाची जनसंवाद यात्रा काढल्यानंतरच आपण कोणत्या पक्षात जाणार याचा निर्णय घेणार असल्याचं 'एबीपी माझा'ला सांगितलं. 

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्नही तापत आहे.  मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्याची मागणीला पाठींबा देत मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे विधानसभा लढवणार आहेत. मुख्यमंत्री किंवा अजित दादांना तिकीट मागायला गेलो तर ते हो म्हणतील. त्यांचं माझ्याबाबतीत मत चांगलं आहे, असंही अर्दड म्हणाले.

अजित दादांचं माझ्याविषयी मत चांगलं

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत मराठवाड्याचे माजी आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दर्शवला. तसेच मुख्यमंत्री किंवा अजित दादांना तिकीट मागायला गेलो तर ते हो म्हणतील. त्यांचं माझ्याविषयीचं मत चांगलं असल्याचं सांगत मुख्यमंत्रीही मला चांगली वागणूक देत असल्याचं सांगितलं. घनसावंगीतून जनसंवाद यात्रा काढल्यानंतरच आपण कोणत्या पक्षात जाणार याचा निर्णय घेणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

मनोज जरांगेंच्या मागणीला पाठिंबा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांसह मराठ्यांना सरसकट कुणबीमधून आरक्षण देण्याची मागणी केलीय. या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अर्दड म्हणाले. सध्या विधानसभा निवडणूकीसाठी इच्छूक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेत असल्याचे दिसून येत असताना माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनीदेखील त्यांनी काही दिवसांपूर्वी  मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर महिनाभराने त्यांनी विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केलं आहे.

जालन्यात विधानसभेच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी

 जालना विधानसभेच्या (Jalna Vidhan Sabha Election 2024) जागेवरून खोतकरआणि दानवे (Arjun Khotkar vs Raosaheb Danve) पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. परंपरेप्रमाणे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरती आता भाजपकडून दावा केला जातोय. तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे बंधू भास्कर दानवे यांनी जालन्याची जागा भाजपला सुटावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्यास म्हटलंय. शिवाय उमेदवारी दिलीच तर कोणी नाही म्हणणार? असं म्हणत जालन्याच्या जागेवरती त्यांनीही आता शड्डू ठोकला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा:

जालना विधानसभेच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? दानवे -खोतकर पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Embed widget