मी महायुतीचा उमेदवार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार, नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य
मी महायुतीचा उमेदवार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी केलं आहे.
Nawab Malik : मी महायुतीचा उमेदवार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी केलं आहे. मला अपेक्षित होतं तेच महायुतीतील काहीजण बोलतात. त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी नेते माझ्यासोबत नाहीत मात्र जनता माझ्यासोबत असल्याचे मलिक म्हणाले.
मी धमक्यासंधर्भात अजिबात तक्रार दिलेली नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याचे मलिक म्हणाले. या भाग आम्हाला ड्रग्स मुक्त करायचा आहे, म्हणुन मी लढतोय असेही मलिक म्हणाले. मी युतीचा उमेदवार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकांमध्ये उत्साह आहे प्रत्येक समाजाचे लोक माझ्यासोबत आहेत असे मिलक म्हणाले.
अजित पवार दबावाखाली आले असते तर मला त्यांनी एबी फॉर्म दिला नसता
भाजपने कितीही विरोध केला, शिवसेनेने उमेदवार दिला तरी मी निवडून येणारच आहे असे मलिक म्हणाले. मला जितका दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, तितकी माझी ताकद वाढत आहे असे मलिक म्हणाले. दोन्ही ठिकाणी आम्ही भारी बहुमताने निवडून येऊ असेही ते म्हणाले. अजित पवार दबावाखाली आले असते तर मला त्यांनी एबी फॉर्म दिला नसता. आमचं कोणाशी काही बोलणं झालं नाही. त्यांनी मला लढण्यासाठी जिंकण्यासाठी उमेदवारी दिलीय तर मी जिंकून दाखवणार असेही मलिक म्हणाले. मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवाब मलिक तर सपाचे अबू आझमी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे बुलेट पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुलेट पाटील हे या विभागातून नगरसेवक होते. पोलीस खात्यात आणि मुख्यत्वे क्राईम ब्रॅंचमध्ये काम करताना त्यांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी पडली होती.
भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही
भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही' असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही', असे आशिष शेलार म्हणाले.