बहिणीसाठी भावांची धावाधाव; काल धनुभाऊंची पावसात सभा, आज प्रचारासाठी सातारहून थेट उदयनराजे मैदानात
Beed Lok Sabha : अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आज शरद पवार आणि अजित पवार उतरणार आहेत.
बीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Election) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तसंच आज बीडमध्ये सांगता सभांचा धडाकाही पहायला मिळतोय. आज पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे देखील आज परळीमध्ये असणार आहेत. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे बहिणीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यासाठी उदयनराजे साताऱ्याहून बीडला रवाना झाले आहेत.
अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आज शरद पवार आणि अजित पवार उतरणार आहेत. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी अंबाजोगाईमध्ये सभा घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची प्रचाराची सांगता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड शहरामध्ये होणार आहे. शरद पवार यांची जाहीर सभा दुपारी आडीच वाजता बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंडवर होणार आहे.
अजित पवारांच्या बीडमध्ये दोन सभा
अजित पवार यांच्या दोन सभा आज बीड जिल्ह्यात होणार आहेत पहिली सभा सकाळी 11 वाजता आष्टी पासून जवळ असलेल्या कडा या ठिकाणी होणार आहे तर परळी शहरात होणाऱ्या सांगता सभेला अजित पवार हे प्रमुख अतिथी असणार आहेत. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये केस तालुक्यातील वडगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे या सभेनंतर उदयनराजे भोसले सुद्धा अजित पवार यांच्या सहमत परळी शहरात होणाऱ्या सांगता सभेच्या व्यासपीठावर होणार आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते एकत्रित
बारा वर्षानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या रणांगणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते एकत्रित येणार आहे. परळीमध्ये निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभा टाकणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये एकत्रित पाहायला मिळते या दोघांचे कार्यकर्ते सुद्धा पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ एकत्रित करताना पाहायला मिळतात. आज प्रचाराच्या सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ही व्यासपीठावर असणार आहेत. उदयनराजे भोसले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अशी एकत्रित ती सभा होईल. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये केस तालुक्यातील वडगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर उदयनराजे भोसले सुद्धा अजित पवार यांच्या सहमत परळी शहरात होणाऱ्या सांगता सभेच्या व्यासपीठावर असतील.
Video:
हे ही वाचा :
Pankaja Munde : म्हणून मराठा भावाच्या मदतीसाठी आले; पंकजा मुंडेंची नगरकरांना भावनिक साद