एक्स्प्लोर

Bajarang Sonawane : बीडचं राजकीय वातावरण तापलं, धनंजय मुंडेंच्या टीकेला सोनवणेंचं प्रत्युत्तर, जिल्हा परिषद निवडणुकीचा इतिहास काढला

Bajarang Sonawane : माझ्यामुळे तीन वेळा जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली, असं प्रत्युत्तर बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे. जिल्हा परिषद निवडून आणण येड्या गबाळ्याचे काम नाही, असं देखील सोनवणे म्हणाले.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha) बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर एकेकाळचे सहकारी धनंजय मुंडे यांनी त्यांच्यांवर टीका केली होती. या टीकेला बजरंग सोनवणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.    

बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना बीडच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका करत आम्ही त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केलं आणि लोकसभेचे देखील तिकीट मिळवून दिलं होतं. मात्र, सोनवणे यांनी ऐन वेळेला धोका दिला अशी टीका केली होती. 

बजरंग सोनवणेंचं प्रत्युत्तर

बजरंग सोनवणे यांनी देखील धनंजय मुंडे यांना थेट उत्तर देत तीन वेळा माझ्यामुळेच जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली त्यामुळे धनंजय मुंडे यांनी यावर बोलू नये. जिल्हा परिषद निवडून आणणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही, असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. 

जिल्हा परिषदेचं तिकीट शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं होतं. हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे की तीन वेळा जिल्हा परिषद फक्त आणि फक्त बजरंग सोनवणे मुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. शरद पवारांना मानणारा हा जिल्हा आहे. जिल्हा परिषद निवडून आणायचं काम येड्या गबाळ्याचं काम नाही. जिल्हा परिषद निवडून आणून पालकमंत्र्याचं नाव करायचं काम आम्ही केलं होतं, असं बजरंग सोनवणे म्हणाले. 

बीडमध्ये पुन्हा मुंडे सोनवणे लढत

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपनं यावेळी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना संधी देण्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे  यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षाकडून राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर संधी देण्यात आली नव्हती. दरम्यानच्या काळात पंकजा मुंडे यांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर भाजपनं पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्यापुढे बजरंग सोनवणे असणार आहेत. यामुळं बीड लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध सोनवणे अशी लढत पाहायला मिळेल. 

संबंधित बातम्या : 

Sanjay Mandlik on Shahu Maharaj : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिकांचा तोल सुटला

Vijay Shivtare : माझ्या मनाला मुरड घालून मी माघार घेतली; सासवडच्या सभेपूर्वी शिवतारेंची कबुली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
Embed widget