एक्स्प्लोर

Sharad Pawar Raj Thackeray : राज ठाकरे तुम्हाला कळले का? पत्रकारांचा थेट प्रश्न, शरद पवारांचं चार शब्दात उत्तर, पाहा व्हिडीओ

Sharad Pawar : शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. राज ठाकरेंनी नुकताच मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केलं. धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश, राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय याबाबत शरद पवारांनी भाष्य केलं. पत्रकारांनी राज ठाकरे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवारांनी मिश्कील उत्तर दिलं.

पत्रकारांनी राज ठाकरेंसदर्भात प्रश्न विचारलं असता शरद पवार म्हणाले की आतापर्यंत राज ठाकरेंनी तीन चार निर्णय गेल्या 10 ते 15 वर्षात घेतले होते. त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला आहे म्हणतात मात्र येत्या दोन चार दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले. राज ठाकरेंनी अनेकदा भाजपसंदर्भात कठोर शब्द वापरले. तर, काही वेळा त्यांना पाठिंबा दिला आहे. पत्रकारांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा अन्वयार्थ काय लावता असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी मी काय अन्वयार्थ लावणार असं म्हटलं. पत्रकारांनी राज ठाकरेंची भूमिका सामान्य माणसांना कळली नाही, असं म्हणत तुम्हाला तरी राज ठाकरे कळले का? असा प्रश्न विचारला यावर शरद पवारांनी मी पण सामान्य नागरिक आहे, असं म्हटलं. 

शरद पवार पुढे म्हणाले की एकनाथ खडसे यांच्या बाबत टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली.  यातना सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना रिलीफ मिळत असेल त्याठिकाणी त्यांनी जावं अशी आमची भूमिका होती.

 धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात येत आहेत. अतुल देशमुख यांचा आज प्रवेश होतोय. या सगळ्यांचे स्वागत असल्याचं शरद पवार म्हणाले. धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. पुणे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे हे देखील प्रवेश करणार आहेत. या सगळ्यांनी कुठलीही अट किंवा अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नाही. 1996 मध्ये बहुमत नसतांना सत्तेचा स्वीकार करणे मला योग्य वाटले नाही, असं शरद पवार म्हणाले. 

आज कोणी भाजपसोबत गेलं का? मागे काय घडलं त्यांनंतर बरेच काही घडलं. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठी माझी सहमती होती हे म्हणण्याला आज काही अर्थ नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Press Conference : धैर्यशील मोहिते-पाटीलांच्या प्रवेशाबाबत शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले... 

Madha : माढ्यात आता निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील धुरळा उडणार; धैर्यशील मोहिते पाटलांचं आणि पवारांचं ठरलं, प्रवेशाची आणि अर्ज भरण्याची तारीखही फायनल

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget