एक्स्प्लोर

राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर, अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून लढवणार निवडणूक

Rahul Gandhi: राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे.  राहुल यंदा अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

Rahul Gandhi:  अनेक दिवस चालढकल केल्यावर राहुल गांधींची (Rahul Gandhi)  दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे.  राहुल यंदा अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून (Raebarli Lok Sabha Election)  निवडणूक लढवणार आहेत.  तर अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार आहेत. प्रियांका गांधी देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.  

गांधी घराण्यातल्या दिग्गज नेत्यांचा एकेकाळचा गड अर्थात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  आजच राहुल गांधींची रायबरेलीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. रायबरेली आणि अमेठीतून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे परंतु आतापर्यंत उमेदवारी जाहीर झाली नव्हती. सकाळीच काँग्रेसने परिपत्रक प्रसिद्ध करत राहुल गांधींना उमेदवारी जाहीर केली. कालपर्यंत अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याच्य चर्चा होत्या. परंतु आता ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे.  अमेठीपेक्षा रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.  2019 साली रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. रायबरेलीत कायम काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे . 

अमेठीचे बदलली गणित पाहता गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा वोच शेअर जवळपास 49 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसचा वोट शेअर हा 40 ते 43 टक्के होता. रायबरेलीच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. रायबरेलीत काँग्रेसचा वोट शेअर हा 45 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर भाजपचा वोट शेअर हा 33 टक्के होता. त्यामुळे रायबरेली हा मतदारसंघ काँग्रेससाठी जास्त सोईस्कर आहे. मूळ या सगळ्यामागचा मुद्दा होता की, गांधी घराण्यातील कोणीतरी उत्तर भारतातून लोकसभेची जागा लढवावी. कारण उत्तर भारतात काँग्रेसची पकड सैल आणि भाजपची पकड मजबूत होत चालली आहे. कारण काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी उत्तर भारताकडे पाठ फिरवली तर संपूर्ण उत्तर भारत भाजपच्या हातात येईल, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे रायबेरली, अमेठी किंवा उत्तर भारतातून गांधी घराण्यातील उमेदवार असा  आग्रह होता. रायबरेलीतून प्रियंका गांधी आणि अमेठीतून राहुल गांधीच्या चर्चा होत्या.मात्र दोघांनी सुरुवातीला निवडणूक लढवण्यास नकार दिला. मात्र सोनिया गांधींच्या मध्यस्तीनंतर राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

राहुल गांधींची निवडणुकीय कारकीर्द

2004 साली राहुल गांधींना 3 लाख 90 हजार 179 मतं पडली तर 2 लाख 90 हजार 853 मतांनी त्यांचा विजय झाला. तसेच, 2009 साली त्यांना 4 लाख 64 हजार 195 मतं पडली तर 3 लाख 70 हजार 198 मतांनी ते विजयी झाले. 2014 साली त्यांना 4 लाख 8 हजार 691 मतं मिळाली आणि ते 1 लाख 7 हजार 903 मतांनी विजयी झाले. मात्र, 2019 त्यांना 4 लाख 13 हजार 394 मतं पडली आणि 55 हजार 120 मतांनी त्यांचा पराभव झाला.

हे ही वाचा :

आज पुण्यात राहुल गांधीची तोफ धडाडणार, काँग्रेसचे दिग्गज नेते राहणार उपस्थित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणीManu Bhakar : मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही शिफारस नाहीABP Majha Headlines :  11 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray Shivsena : मनपा निवडणुकीसाठी ठाकरे सक्रिय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
Embed widget