Pm Modi In Mumbai: मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन; मायानगरीतील 6 जागंसाठी पंतप्रधान मोदींचा रोड शो, सभांचा धडाका
Pm Modi In Mumbai: पंतप्रधान मोदींची मुंबईत 15 मे रोजी मुंबईत पहिली जाहीर सभा होणार आहे. तर 17 मे रोजी रोड शो होणार आहे. अद्याप मोदींच्या सभेचे स्थळ निश्चित करण्यात आलेले नाही.
मुंबई : मुंबईच्या (Mumbai Lok Sabha Election) सहा जागासाठी भाजपने मेगाप्लान तयार आहे. मुंबईच्या जागेसाठी महायुतीने कंबर कसली आहे. आता मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Mumbai) मैदानात आले आहेत. पंतप्रधान मोदींची मुंबईत 15 मे रोजी मुंबईत पहिली जाहीर सभा होणार आहे. तर 17 मे रोजी रोड शो होणार आहे. अद्याप मोदींच्या सभेचे स्थळ निश्चित करण्यात आलेले नाही.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी मुंबईत सहा जागा आहेत, मुंबईच्या सहा जागांमध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा समावेश आहे. भाजप मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्यमधून लढत आहे, तर शिंदे सेना मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्यमधून लढत आहेत.
मोदींच्या आतापर्यंत 16 ठिकाणी सभा
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. मागील वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंतप्रधान मोदींच्या सभांमध्ये वाढ झाली आहे. 2019 सालच्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 51 दिवस प्रचार केला. देशभरात त्यांनी 142 प्रचार सभा घेतल्या तर 4 रोड शो केले होते. सर्वाधिक 50 सभा या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यात घेतल्या होत्या.ही निवडणूक मोदींच्या नावावर लढवली जात असल्याने मोदींनी महाराष्ट्रात आतापर्यंत 16 ठिकाणी सभा घेतल्या आहेत. आतापर्यंत तीन टप्प्याचे मतदान पार पडले आहे.
कोणते सहा उमेदवार रिंगणात?
- मुंबई उत्तर पूर्व - मिहीर कोटेचा
- मुंबई उत्तर पश्चिम - रविंद्र वायकर
- मुंबई उत्तर मध्य - उज्ज्वल निकम
- मुंबई दक्षिण - यामिनी जाधव
- मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
- मुंबई उत्तर - पियुष गोयल
मोदींचा भव्य रोड शो
मुंबईतील व्यावसायिक भाग आणि उच्चभ्रू वस्ती असलेला हा प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत नागरी भाग आहे. मुंबईवर कायमच शिवसेना ठाकरे गटचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर भाजप मुंबईसाठी अतिआग्रही आहे.
स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता तसंच ठाकरे-पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला न बळी न पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान व्हावं असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मोदी यावेळी जास्त मेहनत घेताना दिसत आहेत. त्यामुळे मोदींच थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे.
हे ही वाचा :