मोठी बातमी : ऐन मतदाना दिवशी अजितदादांच्या घरी का गेलात? सुप्रिया सुळेंनी कारण सांगितलं!
Supriya Sule: माझे लहानपण काकूकडेच गेलं आहे. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं आशा काकींनी केलं आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे : बारामतीत (Baramati Lok Sabha Election) मतदान सुरू असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली. त्यानंतर सु्प्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भेटीमागे दडलय काय? या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काकू आवर्जून मतदान करायला आल्या म्हणून भेट घेतली, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) दिली आहे. काटेवाडीतल्या घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नसल्याची माहिती देखील सुप्रिया सुळेंनी या वेळी दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आशा काकींना भेटायला आले होते. त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती. काकी आवर्जून मतदान करायला आल्या होत्या म्हणून मी आली होती. आम्ही फिरत फिरत नेहमीच येतो. काकींना भेटली आणि निघाले. हे माझ्या काका-काकींचं घर आहे. काकींच्या हातचे चपातीचे लाडू बेस्ट असतात. माझे लहानपण काकूकडेच गेलं आहे. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं आशा काकींनी केलं आहे.
माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं माझ्या सगळ्या काकींनी केलं : सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद मी कायमच घेते. काकी आणि मीच होते. हे माझ्या काका - काकींचे घर आहे. आशीर्वाद घेतला आणि लगेच निघाले. माझी प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी दोन महिने दरवर्षी याच घरात जायची. मी सुट्टीत दोन महिने इथे राहायचे. त्या वेळी फोन नव्हते. मी एकदा इकडे आले की, माझे माझ्या आईशी दोन महिने बोलणे पण होत नसे. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं माझ्या सगळ्या काकींनी केलं आहे.
आमच्या सर्व भावंडांचे घर : सुप्रिया सुळे
अजित पवारांच्या घरी गेल्याने राजकरणात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. अजित पवारांच्या घरी असा उल्लेख केला असता सुप्रिया सुळेंनी हे अजित पवारांचे नाही तर माझ्या काका- काकींचे घर आहे, असे अधोरेखीत केले. तसेच हे आमच्या सर्व भावंडांचे घर आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंच्या भेटीचे अनेक तर्क- वितर्क
बारामतीचा मतदानाचा आतापर्यंतचा पॅटर्न लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, असा राहिला आहे. हा पॅटर्न ब्रेक करण्यासाठी अजित पवार महिनाभर संघर्ष करत होते. पण सुप्रिया सुळेंच्या या भेटीनंतर अनेक तर्क- वितर्क लावण्यात येत आहे. मात्र ही राजकीय नाही तर कौटुंबीक भेट असून फक्त माझ्या काकींच्या भेटीसाठी आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Video:
हे ही वाचा: