Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी तर नंदूरबारमध्ये सर्वात जास्त मतदान
Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : देशात लोकसभा निवडणुकीचा आज चौथा टप्पा . महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू, मतदारराजा आज दिग्गजांचं भवितव्य ठरवणार...

Background
Lok sabha Election 2024: राज्यात आज चौथ्या टप्यातील राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा जागा आहेत. या मतदारसंघांत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातल्या सहा लढती अतिशय चुरशीच्या मानल्या जातायत.. बीड, पुणे, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, रावेर आणि अहमदनगरमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
चौथ्या टप्प्यातील लढती
महाराष्ट्रात कुठे होणार पहिल्या टप्प्यातील मतदान आणि उमेदवार
• पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
• बीड - पंकजा मुंडे (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
• शिरुर - अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ( राष्ट्रवादी)
• छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - संदिपान भुमरे ( शिवसेना), चंद्रकांत खैरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
• जालना - रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
• अहमदनगर - सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
• मावळ - श्रीरंग बारणे ( शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
• शिर्डी - सदाशिव लोखंडे ( शिवसेना ), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी)
• रावेर - रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
• जळगाव - स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
• नंदुरबार - हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस)
लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क
पुणे जिल्ह्यात आज मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास मतदान करण्यासाठी आलेले मतदारदेखील पहावयास मिळत होते. डॉ. किरण तुळसे यांनी लंडनवरून येवून आपला मतदानाचा हक्क बजावून स्थानिक नागरिकांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याचे एक आदर्श उदाहरण दिले.
पिंपरी चिंचवड मधील डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत.
आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यांनी सांगितले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.
नंदुरबार - ६०.६०
जळगाव - ५१.९८
रावेर - ५५.३६
जालना - ५८.८५
औरंगाबाद - ५४.०२
मावळ - ४६.०३
पुणे - ४४.९०
शिरूर - ४३.८९
अहमदनगर - ५३.२७
शिर्डी - ५२.२७
बीड - ५८.२१























